गोव्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, टीव्ही कलाकारासह ३ महिलांची सुटका | पुढारी

गोव्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, टीव्ही कलाकारासह ३ महिलांची सुटका

पणजी; पुढारी ऑनलाईन

गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने (Crime Branch of Goa Police) एका हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा (sex racket) पर्दाफाश केला आहे. या कारवाई दरम्यान तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यात तेलंगणा, झारखंड आणि महाराष्ट्रातील महिलेचा समावेश आहे. यातील एक पीडित महिला टेलिव्हिजन कलाकार आहे.

मूळचा आंध्र प्रदेशचा असलेला एक व्यक्ती पणजी आणि आसपासच्या परिसरात हे रॅकेट चालवत होता. त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलिंग दरम्यान हाफिज सय्यद बिलाल (२६) हा सेक्स रॅकेटमध्ये सामील असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ग्राहक बनून संशयिताशी संपर्क साधण्यात आला आणि त्याने ५० हजार रुपये भरून गुरुवारी संध्याकाळी सांगोल्डा येथील एका नामांकित हॉटेलजवळ तीन महिलांना पाठविण्याचे कबूल केले. यावेळी संशयिताला पकडण्यात आले. यावेळी सुटका करण्यात आलेल्या तिन्ही महिला ३० ते ४० वयोगटातील आहेत.

चौकशीदरम्यान संशयितानं पणजीतील एका मोठ्या हॉटेल्समध्ये ग्राहकांना महिला पुरवून हाय-प्रोफाइल रॅकेट चालवत असल्याची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितांपैकी एक महिला टीव्ही कलाकार असल्याचे उघड झाले आहे.

हे ही वाचा :

Back to top button