Budget 2022 : सीमा शुल्क कपातीमुळे रसायने स्वस्त होणार ; हेडफोन, एअरफोन, लाऊडस्पीकर, स्मार्ट मीटर, आर्टिफिशयल ज्वेलरी महागणार
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय अर्थमंत्री (Union Finance Minister) सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातून (budget) रसायांनावरील सीमा शुल्क घटवण्याचा निर्णय जाहीर केला. मिथेनॉलवरीलही (methanol) सीमाशुल्क घटवण्यात येणार आहे. अशात विदेशातून येणारी रसायने स्वस्त होतील. देशांतर्गत मॅन्यूफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी मोबाईल फोन, चार्जर, ट्रान्सफॉर्मर वरील आयात शुल्कातही कपात करण्यात आली आहे. 'स्टिल स्क्रॅप'वरील सीमाशुल्कावरील सूट एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. 'जेम्स अँड ज्वेलरी' वरील सीमा शुल्क ५ टक्क्यांनी घटवण्यात येणार असल्याने ते स्वस्त होतील. दरम्यान कॅपिटल्स गुड्सवर आयात शुल्कावरील सूट रद्द करण्यात आली आहे. आता कॅपिटल्स गुड्सवर ७.५% आयात शुल्क आकारण्यात येईल.
आयातीत खुल्या भागांवर सीमा शुल्कात वाढ करण्यात आल्याने हेडफोन, एअरफोन, लाऊडस्पीकर, स्मार्ट मीटर, आर्टिफिशयल ज्यूलरी, सोलर सेल तसेच सोलर माड्युल सह मोठ्यासंख्येत उपयोगात येणाऱ्या वस्तू अधिक महागतील. विदेशातील छत्र्या देखील महागतील. येत्या ऑक्टोबरपासून मिश्रित तेलावर दोन रूपये प्रती लिटर प्रमाणे उत्पादन शुल्क आकारण्यात येईल.

