Budget 2022 : छत्री झाली महाग आणि डायमंड झाला स्वस्त; बजेट सादर होताच सोशल मीडियावर फनी मीम्स व्हायरल | पुढारी

Budget 2022 : छत्री झाली महाग आणि डायमंड झाला स्वस्त; बजेट सादर होताच सोशल मीडियावर फनी मीम्स व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : (Budget 2022) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वर्ष २०२२-२३ साठी बजेट जाहीर केले. सरकारने असा दावा केलाय की, या बजेटमध्ये सगळ्यांना काही ना काहीतरी मिळेले आहे. नाेकरदारांची नजर प्राप्‍तीकरातील  बदलाकडे लागल्‍या हाेत्‍या; पण त्‍यांच्‍या पदरी निराशा पडली. प्राप्‍तीकर रचनेत यावर्षीही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बजेट सादरीकरणानंतर  सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मीम्स चांगल्याच व्हायरल केल्या आहेत.

टॅक्स मध्ये सवलत न मिळाल्यानंतर सर्वसामान्यांची आणि नोकरदारांची अवस्था सारखीच झाल्‍याचे एका नेटकर्‍याने म्‍हटलं आहे.

अर्थसंकल्पाबाबत सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यावर मीम्स शेअर केल्या जात आहेत.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मध्यमवर्गाची नेहमीच निराशा होते.. यावेळीही तीच स्थिती आहे. अशा पध्दतीच्या मीम्स व्हायरल होत आहेत. (Budget 2022)

 ‘बाहुबली’ चित्रपटातील या सीनचा मीम्स बनवण्यासाठी खूप वापर केला जात आहे.

क्रिप्टोकरन्सीजमधून मिळणाऱ्या कमाईवर 30% कर आकारले जाईल. या घोषणेवरही मीम्स व्हायरल होत आहेत.

अर्थसंकल्पात मध्यमवर्गाची विशेष चर्चा होते. विशेषत: पगार असलेल्या लोकांची जास्त चर्चा असते. (Budget 2022)

टॅक्समध्ये कोणतेच बदल न झाल्याने नेटकऱ्यांनी मीम्स बनवल्या आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button