Aleixo Reginaldo : आलेक्स रेजिनाल्ड पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर, महिनाभरात सोडली तृणमूल काँग्रेस - पुढारी

Aleixo Reginaldo : आलेक्स रेजिनाल्ड पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर, महिनाभरात सोडली तृणमूल काँग्रेस

पणजी: पुढारी वृत्तसेवा
भाजपचा पराभव केवळ तृणमूल काँग्रेसचे करेल. त्यामुळे आपण काँग्रेस सोडली, असे सांगणारे कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड ( Aleixo Reginaldo ) यांनी रविवारी तृणमुल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्ष प्रवेश केल्यानंतर केवळ २७ दिवसातच त्यांनी राजीनामा दिला. ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील होतील, अशी चर्चा आहे. नुकतेच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार मायकल लोबो यांनी ट्विटरवरून रेजिनाल्ड यांना पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याची विनंती केली आहे.

Aleixo Reginaldo : गडबडीत तृणमूल मध्ये जाण्याची चूक केली

लोकांना न विचारता मी गडबडीत तृणमूलमध्ये जाण्याची चूक केली. मात्र पुन्हा अशी चूक करणार नाही पुढे जे काही करायचे ते लोकांना विचारूनच ठरवेन. माझ्या लोकांचे चांगले व्हावे, या उद्देशाने मी तृणमूल मध्ये गेलो होतो. माझ्या निर्णयामुळे जर कोणी दुखावले असेल तर त्यांची क्षमा मागतो, असे रेजिनाल्ड यांनी म्हटले आहे.

मागील महिन्‍यात केला होता तृणमूलमध्‍ये प्रवेश

रेजिनाल्ड यांनी मागच्या महिन्यात तुम्ही तृणमूल मध्ये प्रवेश केला होता.  मात्र तृणमूलमध्ये सामील झाल्यानंतर त्यांची लोकप्रियता झपाट्याने उतरू लागली. अशातच काही काँग्रेस नेते पुन्हा त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.  महिनाभरापूर्वी  रेजिनाल्ड यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करत तृणमूल काँग्रेस मध्ये उडी मारली होती. त्या पूर्वी आपल्या वाढदिनी त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करण्याची तयारी केली होती; पण नंतर राहुल गांधी यांनी समजूत काढल्यावर त्यांनी निर्णय बदलला होता. रेजिनाल्ड आता पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ :

 

 

Back to top button