Mutton Dalcha : झणझणीत मटण दालचा कसा कराल? | पुढारी

Mutton Dalcha : झणझणीत मटण दालचा कसा कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क

आता बऱ्यापैकी आपल्या इकडचे सणासुदीचे दिवस संपलेले आहेत. दिवाळीचा फराळ खाऊनही कंटाळा आला आहे. आता फक्त झणझणीत आणि मसालेदार खाण्याची ओढ मांसाहारप्रेमींना लागलेली आहे. तर आपण आज ‘मटण दालचा’ (Mutton Dalcha) कसा करायचा, हे पाहणार आहोत… चला तर मटण दालचा रेसिपीकडे मोर्चा वळवू…

Mutton Dalcha

 

मटण दालचाची साहित्य

१) तीनशे ग्रॅम चना डाळ

२) अडीचे ग्रॅम मटण

३) बारीक चिरलेला एक इंचाचे आल्ले

४) बारीक चिरलेल्या ४ लसणाच्या कुड्या

५) दोन हिरव्या मिरच्या, वेचली पावडर

६) मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून, फ्राय केलेले

७) एका लिंबुचा रस

८) एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धने पावडर

९) तीन चमचे तेल आणि चवीनुसार मीठ

Mutton Dalcha

मटण दालचाची कृती

१) पहिल्यांदा स्वच्छपणे डाळ धुऊन घ्या. त्यानंतर किमान अर्धा तास डाळ भिजण्यासाठी ठेवा.

२) त्यानंतर चिमूटभर हळद आणि एक चिमूटभर साखर घालून कुकरमध्ये तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.

३) मटण व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर सुती कापडाच्या सहाय्याने मटण कोरडे करून घ्या.

४) त्यानंतर गॅसवर प्रेशन कुकर ठेवून त्यात तेल गरम करून घ्या. त्यात कापलेला कांदा, लालसर रंग प्राप्त होईपर्यंत फ्राय करा. त्यानंतर लसूण, हरवी मिर्ची आणि मटण घाला.

५) मटणालाही ब्राऊन कलर प्राप्त होईपर्यंत आणि तेल वेगळे होईपर्यंत फ्राय करत रहा. त्यानंतर हळद, मिरची पावडर आणि धने पावडर घाला. २ मिनिटांपर्यंत हे सर्व पदार्थ हलवत रहा.

६) त्यानंतर त्यात कप पाणी घाला, जेणे करून मटण पाण्यात बुडून जाईल. नंतर कुकर बंद करून ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.

७) मटण शिजून थंड झाल्यानंतर डाळ, फ्राय केलेला कांदा, वेलची पावडर, लिंबूचा रस आणि मीठ घाला. त्यानंतर १० मिनिटांपर्यंत मध्यम गॅसवर शिजवा. हे शिजवत असताना मधेमधे हलवत रहा. अशाप्रकारे मटण दालचा तयार झाला. गरम-गरमच मटण दालचा (Mutton Dalcha) खाण्यासाठी घ्या.

या रेसिपीचा व्हिडीओ पहा : कोकणी खेकडा फ्राय रेसिपी माहीत आहे का?

ह्या रेसिपी वाचल्यात का?

Back to top button