Sweet Corn Chicken Soup : 'स्वीट-कॉर्न चिकन सूप'; घरच्या घरी करा तेही २० मिनिटांत | पुढारी

Sweet Corn Chicken Soup : 'स्वीट-कॉर्न चिकन सूप'; घरच्या घरी करा तेही २० मिनिटांत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

भूक वाढवणारा, कमी खर्चात जिभेची चव भागवणारा आणि महत्त्‍वाचे म्हणजे पचनास हालका असणारा पदार्थ म्हणजे सूप. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अत्यंत चवीने सूप पिले जाते. त्यातल्या त्यात नॉनव्हेज सूप पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हाॅटेलसारखी टेस्‍ट असणारे सूप कशा पद्धतीने तयार केले जाते याची माहिती नसते. त्‍यामुळे बाहेर जावून भरमसाठ पैसे खर्च करुन अनेकजण सूप पिण्यास जातात. आता आपण घरच्या घरी २० मिनिटांत  तयार होणारे स्वीट-कॉर्न चिकन सूप ( Sweet Corn Chicken Soup ) कसे केले जाते ते पाहूया.

साहित्य:

  • ५ कप चिकन शिजवून तयार झालेला स्‍टॉक
  • दीड कप कॉर्न क्रीम
  • एक टी स्पून मीठ
  • एक टी स्पून साखर
  • पाव टी स्पून मिरे पूड
  • ३ ते ४ टेबल स्पून कॉर्न फ्लॉअर,
  • एक अंडे (पिवळा बलक नको)
  • ३ टेबल स्पून शिजलेले पण बारीक केलेले चिकन

सूप तयार करण्याची पद्धत

  • सुरवातीला चिकन शिजवून काढलेला पाच कप चिकन स्टॉक मध्यम गॅसवर उकळत ठेवा
  • त्यानंतर त्यामध्ये त्यात कॉर्न क्रीम टाकून उकळून घ्या
  •  मीठ, साखर आणि मिरे पावडर टाका व किमान २ मिनिटे उकळा
  • त्यानंतर एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉअरची पेस्ट करून घ्या. ती जरा जरा उकळत्या सूपात टाकत चमच्याने ढवळत रहा
  • पाच मिनिटे उकळल्यावर त्यामध्ये एका अंड्याचे पिवळे बलक बाजूला काढून पांढरे बलक चांगले फेटून घेवून तेही उकळत्या सूपमध्ये टाकत रहा.
  • एक मिनिटांनंतर गॅस बंद करा.
  • आता त्यामध्ये बारीक केलेले चिकनचे तुकडे टाका आणि तयार झालेला चिकन स्वीट-कॉर्न सूप सर्वांना सर्व्ह करा

 

Back to top button