जगाला स्पर्श देणारा अवलिया स्टीव्ह जॉब्स  | पुढारी

जगाला स्पर्श देणारा अवलिया स्टीव्ह जॉब्स 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आयफोन आणि आयपॅडची निर्मिती करुन क्रांती घडवणारे अपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. एकेकाळी यशाच्या शिखरावर असताना त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. त्यातून त्यांनी पुन्हा एकदा गतवैभव मिळवले. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल माहिती नसलेल्या या गोष्टी…

लग्नापूर्वी जन्मलेले मुल

स्टीव्ह जॉब्जचा जन्मदाता पिता अब्दुलफताह जंडाली आणि आई जोन सिम्पसन यांची भेट कॉलेजात शिक्षण घेताना झाली. २४ फेब्रुवारी १९९५ ला स्टीव्हचा जन्म झाला. त्यानंतर त्याच्या जन्मदात्यांनी विवाह केला. पण त्यापूर्वी त्याला अमेरिकेतील पाऊल आणि क्लॅराकडे दत्तक दिले. जेव्हा स्टीव्हच्या जन्मदात्यांना समजले की पाऊल आणि क्लॅरा ग्रॅज्युएट नाहीत तेव्हा त्यांनी स्टीव्हला कॉलेजचे शिक्षण देणार असाल तरच दत्तक देण्याची अट ठेवली होती. 

कॉलेज बंद करण्याचा निर्णय आयुष्य बदलवणारा..

सिलिकॉन व्हॅलीच्या होमस्टीड हायस्कूलमधून स्टीव्ह जॉब्जने ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर ओरेगॉन येथे रीड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र पालकांच्या पैशावर शिकण्यापेक्षा स्वत: काहीतरी करावे म्हणून कॉलेजचे शिक्षण बंद करुन काही क्लासेस लावले त्यामध्ये कॅलीग्राफीही शिकून घेतली. २००५ मध्ये एका भाषणात स्टीव्हने म्हटले होते की,‘जर मी कॉलेजचे शिक्षण बंद केले नसते तर ‘मॅक’मध्ये वेगवेगळे फॉन्ट आणि त्याचे डिझाईन दिसले नसते.

‘एचपी’ कंपनीने दिली होती ‘समर जॉब’ची ऑफर

स्टीव्ह जॉब्ज १२ वर्षांचा असताना ‘एचपी’ कंपनीचे संस्थापक बिल हॉवलेट यांनी त्याला समर जॉबची ऑफर दिली होती. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक्स पार्ट बनवणाऱ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याबद्दल जॉब्जने विचारले होते. स्टीव्ह जॉब्जला लहानपणापासूनच इंजिनिअरींगमध्ये आवड होती. 

स्वत:च्याच कंपनीमधून बाहर पडावे लागले

स्वत:च स्थापन केलेल्या कंपनीतून बाहेर पडण्याची वेळ स्टीव्ह जॉब्जवर आली होती. पेप्सीच्या एक्झिक्युटीव्ह जॉन स्कुली याला त्यांनीच ॲपलमध्ये आणले होते. त्याच्याबरोबर मतभेद झाल्यानंतर त्यांना ॲपलमधून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर स्टीव्ह जॉब्जने नेक्स्ट कॉम्प्युटरचा प्रोजेक्ट सुरू केला. पण तो प्रयत्न फसला कारण त्याचा निर्मिती खर्च जास्त होता.

ॲपलमध्ये पुन्हा रुजू

ॲपल कंपनीला १९९६ मध्ये मोठे नुकसान झाले. त्यावेळी नेक्स्ट कॉम्प्युटरचा प्रोजेक्ट स्टीव्ह जॉब्जने ॲपललाच विकून कंपनीचा चीफ एक्झिक्युटीव्ह बनला. पुढच्याच वर्षी त्यांनी कंपनीच्या सीईओ पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. तत्पूर्वी त्यांनी ज्याच्यामुळे कंपनी सोडावी लागली त्या जॉन स्कुलीला कंपनीतून काढून टाकले. त्यांनतर ‘मॅक’ कॉम्प्युटर ॲपलने बाजारात आणला. त्यात कंपनीला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला.

आयपॅड आणि आयफोन

मोबाईल, कॉम्प्युटरमध्ये क्रांती करत ॲपलने आयपॉड लाँन्च केला त्याचबरोबर आयट्यून स्टोअरदेखील सुरू केले. त्याच्या पुढची पायरी म्हणजे २००७ मध्ये ॲपलला सर्वाधिक प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या आयफोनचे लॉन्चिंग झाले. त्यानंतर जगभरात आयफोनची क्रेझ निर्माण झाली ती आजतागायत कायम आहे. इतर अनेक कंपन्यांनी आयफोनला टक्कर देण्याचा प्रयत्न केला तरीही आयफोनने आपले स्थान अबाधित राखले आहे. स्टीव्ह जॉब्जने २०११ मध्ये सीईओ पदाचा राजीनामा देवून बोर्डाचे अध्यक्षपद सांभाळण्यात धन्यता मानली.

साधी राहणी

ॲपलचा सीईओ जमिनीवर झोपायचा म्हटले तर आश्चर्य वाटेल. आपल्या राहण्याच्या खोलीत एकही फर्निचर स्टीव्ह जॉब्ज यांनी ठेवले नव्हते. भिंतीवर केवळ आईनस्टाईनचा फोटो होता. आयुष्यातील संघर्षाच्या काळात जमिनीवर झोपायला लागले होते. एकवेळ जेवणासाठी सात किलोमीटर चालावे लागले होते याची आठवण त्यांनी कायम ठेवली होती. त्यामुळे त्यांनंतरच्या काळात येणाऱ्या संघषावेळी मानसिकदृष्ट्या खचून गेलो नाही, असे त्यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटले होते.

स्टीव्ह अध्यात्मासाठी भारतात

इलेक्ट्रॉनिक आणि व्हिडिओ गेम कंपनीबरोबर काम केल्यानंतर स्टीव्हला अध्यात्माची आवड लागली. आध्यात्मिक शांतीच्या शोधात १९७४ मध्ये तो भारतात आला होता. त्यानंतर त्याने प्राण्यांचे मांस खाणे बंद केले. फक्त मासे आणि समुद्री प्राण्यांचा समावेश असलेले मांसाहारी पदार्थच खायला सुरूवात केली. तसेच अनवाणी पायाने चालायला त्याला आवडत होते.

कंपनीत परतल्यानंतरचा पोशाख

स्टीव्ह जॉब्ज १९९८ मध्ये कंपनीत परतला. त्यावेळी त्याने ब्लॅक टी शर्ट आणि निळी जीन्स घालायला सुरूवात केली. हाच पोशाख त्याने पुढे कायम वापरला. 

कॅन्सरशी झुंज अपयशी

स्टीव्ह जॉब्जला २००३ मध्ये पेन क्रिएटिव्ह कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यांचे वजन वेगाने कमी होऊ लागले. थोडेसे चालले तरी धाप लागायची. या आजारपणावर उपचार करण्याची विश्रांती घेण्याची गरज होती. सर्जरी करण्याचा निर्णय त्यांनी तब्बल नऊ महिने पुढे ढकलला. या काळात त्यांनी आहारात बदल करुन इतर उपचार करण्यास सुरूवात केली. तसेच जॉब्जने कंपनीच्या कामात स्वत:ला झोकून दिले. औषधोपचार वेळेवर न घेतल्याने कॅन्सर वाढत गेला आणि त्यातच त्याचे ५ ऑक्टोबर २०११ रोजी निधन झाले. 
 

Back to top button