आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पैसे पाठवता येणार | पुढारी | पुढारी

आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पैसे पाठवता येणार | पुढारी

भारतात इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉटसअ‍ॅपचे जवळपास 20 कोटी वापरकर्ते आहेत.  त्याचा वापर आतापर्यंत चॅटिंगसाठी करत होतो. लवकरच आता याद्वारे पैसेही पाठवता येणार आहे. याद्वारे कोणत्याही खात्यातील धारकांना युनिफाइड पेमेंट इंटरफेसमध्ये पैसे पाठविता येईल.  व्हॉट्सअ‍ॅप हे पहिले मोबाइेल अ‍ॅप असेल जे डिजिटल पेमेंटसाठी मल्टी बँक पार्टनरशिपसोबत काम करेल, कारण भारतामध्ये व्हॉट्सअ‍ॅपला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने व्हॉट्सअ‍ॅपला पैसे हस्तांतरण सेवेला मंजुरी दिली आहे.  व्हॉट्सअ‍ॅपच्या ताज्या बीटा आवृत्तीमध्ये याची थोडी झलक दिसून येते. यामध्ये  सरकारच्या युपीआय प्रणालीवर आधारित देवाण-घेवाण करण्यात येणार आहे.

पहिल्यांदा अँड्रॉइड या प्रणालीवर ही सिस्टीम येऊ शकते. यासाठी डॉक्युमेंट, गॅलरी, ऑडिओ, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट यांच्यासोबत ‘पेमेंट’ या नावाने नवीन पर्याय देण्यात येणार आहे. यावर क्लिक केल्यावर युजरच्या ‘युपीआय’ अकाऊंट उघडते.  कुणाचे युपीआयवर अकाऊंट नसल्यास त्याला याबाबत सूचित केले जाते.  एकमेकांचे युपीआयचे अकाऊंट संलग्न केले की, कुणीही यावरून पैशांची देवाण-घेवाण करू शकतो. काही बीटा युजर्सला याचा वापरदेखील करता येत आहे. काही दिवसांमध्ये ही प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे. 

-अमोल हंकारे, आगळगाव
 

Back to top button