पुढारी कस्तुरी क्‍लब आणि प्रतिराज यूथ फौंडेशन आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल ४ मे पासून | पुढारी

पुढारी कस्तुरी क्‍लब आणि प्रतिराज यूथ फौंडेशन आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल ४ मे पासून

इस्लामपूर : प्रतिनिधी

सध्या सुट्टीमुळे बच्चे कंपनीची धमाल सुरू आहे. खेळाचे, फिरण्याचे अन् मस्त टाईमपास करण्याचे दररोज नवनवे प्लॅन्स आखले जात आहेत. आता बच्चे कंपनीसह त्यांच्या कुटुंबीयांचा मे महिन्याचा पहिला आठवडाही धम्माल मस्तीत जाणार आहे. कारण ‘पुढारी कस्तुरी क्‍लब’ आणि प्रतिराज यूथ फौंडेशन घेऊन येत आहेत, शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल. या ठिकाणी मनसोक्‍त खरेदीबरोबरच लज्जतदार पदार्थांवर ताव मारता येणार आहे. सोबतीला विविध ऑफर्सची बरसात आहेच. म्हणजेच यंदाचा उन्हाळा इस्लामपूरकरांसाठी ‘कूल’ असणार आहे. या फेस्टिवलसाठी प्रायोजक म्हणून प्रतिराज फौंडेशन आणि सहप्रायोजक शाल्वी इंटरप्रायजेस हे लाभले आहेत.

हे फेस्टिव्हल शुक्रवार, दि. 4 मे पासून 6 मे पर्यंत इस्लामपूरमधील जयंत पाटील खुले नाट्यगृहमध्ये होणार आहे. हे फेस्टिव्हल सर्वांसाठी खुले असणार आहे. दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब आयोजित फूड फेस्टिव्हल म्हणजे इस्लामपूरकरांसाठी पर्वणीच असणार आहे. व्हेज, नॉनव्हेज असो, स्नॅक असो वा जेवण. खाण्यावर प्रेम करणार्‍यांना प्रत्येक पदार्थाची चव चाखून बघायला नक्‍कीच आवडते. त्यामुळे मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थांची येथे असंख्य व्हरायटी असेल. मांसाहारी पदार्थांमध्ये बिर्याणी, वडा, कोंबडा, चिकण, बिर्याणी, कबाब, चिकन, लॉलीपॉप, तंदूर, चिकन 65, मटण ताट, खिमा, फिश, मंच्युरियन तर शाकाहारीमध्ये पिझ्झा, ब्रर्गर,  डोसा, उताप्पा, गोबी मंच्युरियन, भेल, पाणीपुरी, सँडविच, पप्स, चीज, झुणका भाकर, व्हेज, पुलाव, सोलकढी, आईस्क्रीम आदी पदार्थ असणार आहेत. मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थांचे स्वतंत्र विभाग असणार आहेत. सोबत मनसोक्‍त खरेदीसाठी गृहउपयोगी वस्तूंची भरपूर व्हरायटी आणि नाविन्यपूर्ण प्रॉडक्टस् असणार आहेत.

संबंधित बातम्या

फेस्टिव्हलच्या स्टॉल बुकिंगसाठी इस्लामपूर  8805023883, 8805024242 सांगली 8805007176, 7385816979 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा.

झी मराठी कलाकारांना भेटण्याची संधी

कस्तुरी शॉपिंग फूड फेस्टिव्हलमध्ये 4 मे रोजी ‘लागिर झालं जी’ या मालिकेतील अजिंक्य आणि शितल तसेच 5 मे रोजी ‘संभाजी’ या मालिकेतील संभाजी अर्थात अमोल कोल्हे आणि पुतळाबाई अर्थात पल्‍लवी वैद्य हे इस्लामपूरकरांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत.

Back to top button