कस्तुरी क्‍लबतर्फे आष्टा येथे केक कार्यशाळा | पुढारी

कस्तुरी क्‍लबतर्फे आष्टा येथे केक कार्यशाळा

इस्लामपूर : प्रतिनिधी

ख्रिसमस अगदी काही दिवसांवर आला आहे. या सणाचे खास आकर्षण  म्हणजे विविध प्रकारच्या केकचे. ख्रिसमसचे औचित्य साधून  कस्तुरी क्‍लबतर्फे केक मेकिंग कार्यशाळेचे आयोजन केले आहे.  यात बेकिंग, कटिंग, आयसिंगपासून प्लेन केक, सनप्लॉवर केक, रेंबो केक, ब्लॅक फॉरेस केक शिकविले जाणार आहेत. विविध नोझल, डिझाईनची माहिती दिली जाणार आहे.

ही कार्यशाळा प्रियांका शिंदे या घेणार आहेत. ही कार्यशाळा 25 डिसेंबररोजी दुपारी 12 वाजता लांडे कॉम्प्लेक्स, मेन रोड, दत्त मंदिर चौक, आष्टा येथे होणार आहे.  कस्तुरी सभासदांना प्रवेश विनामूल्य असून ओळखपत्र सोबत असणे बंधनकारक आहे. इतर महिलांना 300 रु. फी आकारली जाईल. नाव नोंदणीसाठी संपर्क -संयोजिका मंगल देसावळे, 8830604322, कमिटी मेंबर – माधुरी पाटील – 7385166007, स्वाती सूर्यवंशी – 9960970613, मंजुश्री महामुनी – 8888496828.

संबंधित बातम्या
Back to top button