आष्टा येथे उद्या दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने केक कार्यशाळा | पुढारी

आष्टा येथे उद्या दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने केक कार्यशाळा

इस्लामपूर : प्रतिनिधी

‘ख्रिसमस’ या सणाचे खास आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या केकचे. म्हणूनच कस्तुरी क्‍लबच्यावतीने केक मेकिंग कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत बेकिंग, कटिंग, आयसिंगपासून प्लेन केक, सनफ्लॉवर केक, रेम्बो केक, ब्लॅक फॉरेस्ट केक आदी केकचे प्रकार शिकविले जाणार आहेत. 

त्याचबरोबर विविध नोझल तसेच विविध डिझाईनची माहिती या कार्यशाळेत दिली जाणार आहे. ही कार्यशाळा (केक मास्टर) प्रियांका शिंदे या घेणार आहेत. 

ही कार्यशाळा दि. 25 डिसेंबररोजी दुपारी 12 वाजता लांडे कॉम्प्लेक्स, मेन रोड, दत्त मंदिर चौक, आष्टा येथे घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी कस्तुरी सभासदांना प्रवेश विनामूल्य असून  ओळखपत्र सोबत असणे बंधनकारक आहे. तर इतर महिलांना 300 रुपये फी आकारली जाईल. 

संबंधित बातम्या

नाव नोंदणीसाठी संपर्क : संयोजिका मधू देसावळे – 8830604322, कमिटी मेंबर – माधुरी पाटील – 7385166001, स्वाती सूर्यवंशी – 9960970613, मंजुश्री महामुनी – 8888496828.

Back to top button