जय जय स्वामी समर्थ प्रश्‍नमंजूषा उद्यापासून...दै.‘पुढारी’ कस्तुरी क्लब, कलर्स मराठीतर्फे आयोजन | पुढारी

जय जय स्वामी समर्थ प्रश्‍नमंजूषा उद्यापासून...दै.‘पुढारी’ कस्तुरी क्लब, कलर्स मराठीतर्फे आयोजन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे…’ असा संदेश देणार्‍या स्वामी समर्थ यांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकणारी ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका ‘कलर्स मराठी’ चॅनेलवर सुरू आहे. यानिमित्ताने दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आणि कलर्स मराठीतर्फे प्रश्‍नमंजूषा आयोजित करण्यात आली आहे. याची सुरुवात गुरुवार, दि. 8 जुलैपासून होत आहे. 

आठवडाभर म्हणजेच सोमवार ते शनिवार या कालावधीत दररोज रात्री 8 वाजता, मालिकेचा भाग प्रसारित होणार आहे. दै. ‘पुढारी’ कुस्तुरी क्लब आणि कलर्स मराठीतर्फे आयोजित प्रश्‍नमंजूषा अंतर्गत मालिकेवर आधारित प्रश्‍नांची उत्तरे देणार्‍या भाग्यवान महिलांना 500 रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर जिंकण्याची संधी दररोज मिळणार आहे. मालिकेवर आधारित प्रश्‍न ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या प्रत्येक विभागाच्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप्सवर तसेच पुढारी कस्तुरी या फेसबुक पेजवर मालिका सुरू होण्यापूर्वी मिळतील. रात्री 8.30 ते 10 या वेळेत प्रथम उत्तर देणार्‍या प्रत्येक विभागातील एका महिलेला 500 रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर देण्यात येणार आहे.

कोल्हापूर, गडहिंग्लज, सांगली, इस्लामपूर, सातारा, कराड आणि पुणे या 7 विभागांसाठी ही स्पर्धा होईल. प्रश्‍न पाहण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करा. – कोल्हापूर : 9850844271, गडहिंग्लज : 9423539561, सांगली : 9607957576, इस्लामपूर : 8308706122, सातारा : 9762527109, कराड : 8796471210, पुणे : 7972252835 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मालिकेत काय पाहाल…? 

ब—ह्मांडनायक श्री स्वामी समर्थ यांनी भक्‍तांना सन्मार्ग दाखवला. त्यांची उपासना कोणालाही कोणत्याही कर्मकांडात अडकवत नाही. अशाच असाधारण सिद्धपुरुषाचे जीवनचरित्र या मालिकेतून दाखविण्यात आले आहे. शिरीष लाटकर लिखित या मालिकेची निर्मिती कॅम्सक्लब यांनी केली आहे. आजच्या विज्ञाननिष्ठ काळात या मार्गदर्शक ठरणार्‍या मालिकेचा लाभ आवर्जून घ्यावा, असे आवाहन कलर्स मराठीतर्फे करण्यात आले आहे. 

Back to top button