Ganesh Utsav 2023 : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर श्री गणेशाच्या स्थापनेने गणेश उत्सवाचा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेशाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापना करण्यात आली. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या स्थापनेने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. गणरायांच्या आगमनाने नवीन आशा, नवी उमेद, प्रसन्नता निर्माण झाली आहे. सर्वत्र गणेश उत्सवाचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया, गणपतीचा जयजयकार या घोषणा देत श्री गणेशाची स्थापना केली जात आहे. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. गणपतीच्या आरतीसह श्री प्रभू रामचंद्रांची आरती ही गणेश चतुर्थी उत्सव काळातील पुजेत म्हटली जाते.
उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेही लंकापुरी विध्वंसूनी ॥
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह अहंभाव रावण निपटोनी ॥
जयदेव जयदेव निजबोधरामा ।
परमार्थे आरती, सद्भावे आरती ॥
परिपूर्ण कामा । जयदेव जयदेव ॥धृ ॥
प्रथम सीताशुध्दी हनुमंत गेला ।
लंका दहन करूनी अखया मारीला ॥
मारिला जंबुमाळी भुवनीं त्राहटिला ।
आनंदाची गुढी घेऊनिया आला ॥1॥
परमार्थे आरती, सद्भावे आरती ॥
परिपूर्ण कामा । जयदेव जयदेव ॥धृ ॥
निजवळें निजशक्ती सोडविली सीता ।
म्हणूनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ॥
आनंदे वोसंडे वैराग्य भरता ।
आरती घेऊनी आली कौसल्या माता ॥2॥
परमार्थे आरती, सद्भावे आरती ॥
परिपूर्ण कामा । जयदेव जयदेव ॥धृ ॥
अनुहत ध्वनि गर्जति अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार॥
अयोध्येसी आले दशरथकुमार।
नगरी होत आहे आनंद थोर ॥3॥
परमार्थे आरती, सद्भावे आरती ॥
परिपूर्ण कामा । जयदेव जयदेव ॥धृ ॥
सहज सिंहासनी राजा रघुवीर।
सोहंभावे तया पूजा उपचार ॥
सहजाची आरती वाद्यांचा गजर।
माधवदासा स्वामी आठव ना विसर ॥4॥
परमार्थे आरती, सद्भावे आरती ॥
परिपूर्ण कामा । जयदेव जयदेव ॥धृ ॥
हेही वाचतलंत का?