Ganesh Utsav 2023 : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर श्री गणेशाची स्थापनेने गणेश उत्सव 2023 चा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेशाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापना करण्यात आली. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या स्थापनेने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. सर्वत्र गणेश उत्सव 2023 चा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. विघ्नहर्ता बाप्पा सर्वांच्या आयुष्यातील विघ्न दूर करो, हीच प्रार्थना आहे. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. तसेच गणपतीच्या आरतीसह श्री स्वामी समर्थांची आरती ही गणेश चतुर्थी उत्सव काळातील पुजेत म्हटली जाते.
जयदेव जयदेव श्री स्वामीसमर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा ।।ध्रु ।।
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी। जगदुध्दारासाठी राया तू फिरसी ।
भक्त वत्सल खरा तू एक होसी। म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी ।।१।।
जयदेव जयदेव श्री स्वामीसमर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा ।।ध्रु ।।
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार। याची काय वर्णू लीला पामर ।
शेषादिक शिणले नलगे त्या पार । तेथे जढमूढ कैसा करु विस्तार ।।२।।
जयदेव जयदेव श्री स्वामीसमर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा ।।ध्रु ।।
देवाधिदेव तूं स्वामीराया। निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया।
तुजसी अर्पण केली आपली ही काया। शरणागता तारी तू स्वामीराया ।।३।।
जयदेव जयदेव श्री स्वामीसमर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा ।।ध्रु ।।
अघटितलीला करुनी जडमूढ उध्दरीले। कीर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे।
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले। तुझ्या सूता नलगे चरणावेगळे ।।४।।
जयदेव जयदेव श्री स्वामीसमर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा ।।ध्रु ।।
हेही वाचलंत का?