गणेश उत्सव २०२३ : लाडक्या गणरायाचे आज आगमन होणार आहे. घरोघरी श्री गणेशाची स्थापना केली जाणार आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी घरोघरी सुंदर सजावट तयार करण्यात आली आहे. गणपती बाप्पांसाठी वैशिष्ट्यपूर्ण देखावे करण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत आहे. गणेश मूर्तींनी बाजारपेठा सजल्या आहेत. लोकांनी आधीच गणेश मूर्ती घरात आणून ठेवली आहे. तर गणपती सह गौरीचे आगमन करण्यासाठीचीही लगबग सुरू आहे. गौरी-गणपतींसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक मखरे आणण्यात आली आहे. तर मंडळांनी गणेश मूर्ती मंडळात आणून ठेवल्या आहेत. आजपासून सार्वजनिक गणेश उत्सवाला प्रारंभ होत आहे. विघ्नहर्ता बाप्पा सर्वांच्या आयुष्यातील विघ्न दूर करो, हीच प्रार्थना आहे. गणेश उत्सवात गणपतीच्या आरतीसह श्री दत्तांची आरतीही गायली जाते.
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ॥
नेती नेती शब्द न ये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळिंता हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैंचा हा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥ २ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळिंता हरली भवचिंता ॥ धृ ॥
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद् भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळिंता हरली भवचिंता ॥ धृ ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।
एका जनार्दनी श्री दत्तध्यान ॥ ४ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळिंता हरली भवचिंता ॥ धृ ॥
हेही वाचलंत का?