गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर श्री गणेशाची स्थापनेने गणेश उत्सव 2023 चा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेशाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापना करण्यात आली. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या स्थापनेने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. सर्वत्र गणेश उत्सव 2023 चा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. विघ्नहर्ता बाप्पा सर्वांच्या आयुष्यातील विघ्न दूर करो, हीच प्रार्थना आहे. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. तसेच गणपतीच्या आरतीसह श्री शारदेची आरती ही गणेश चतुर्थी उत्सव काळातील पुजेत म्हटली जाते.
शुध्द स्फटिकमयी वरमाला । पुस्तक शुकसितकमला ।
वाग्जाड्या हरूनी । शुभ मति दे देवि सरस्वति वरदे ॥1॥
आरती ओवाळूं शारदे । सुरवरवंदितपादे ॥ आरती॥
हंसावरि बसुनी सत्वर ये । श्रीमति भारति अभये ।
मन्मुखिं वास करी श्रुतिगेये । विजये निहता पाये ॥
वारितनिजखेदे पारदे । भास्वति परमामोदे ॥2॥
आरती ओवाळूं शारदे । सुरवरवंदितपादे ॥ आरती॥
होती मूकहि ते वाचाळ । न लगे क्षणभरी काळ ।
तूं जरि करूणेने केवळ । पाहतां एक वेळ ।
म्हणुनि वासुदेव शारदे । प्रार्थित परमानंदे ॥3॥
आरती ओवाळूं शारदे । सुरवरवंदितपादे ॥ आरती॥
हेही वाचलंत का?