राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के, यंदाही मुलींची बाजी  (video) | पुढारी

राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के, यंदाही मुलींची बाजी  (video)

पुणे : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज ( दि. 29) पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाची घोषणा केली. यंदा राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला असून, यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.

दहावी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२९) जाहीर करण्यात आला. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पहायला मिळणार आहे. 

संबंधित बातम्या

दरवर्षी दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. परंतु, यंदा कोरोना संसर्गामुळे उत्तरपत्रिका तपासण्यातील अडचणींमुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. गेल्या काही दिवसांत सीआयएसई, सीबीएसईचे दहावी-बारावीचे निकाल व राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे दहावीचा निकाल कधी जाहीर होणार, याकडे पालक-विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. अखेर हा निकाल जाहीर झाला आहे. 

इथे पाहता येणार निकाल…

www.mahresult.nic.in

 www.sscresult.mkcl.org

 www.maharashtraeducation.com 

 

 

*एस.एस.सी. बोर्ड निकाल २०२०*

*राज्याचा निकाल – ९५.३०%*

मुली ९६.९१ %

मुले ९३.९९ %

*कोकण बोर्ड (सर्वात जास्त) – ९८.७७%*

पुणे बोर्ड – ९७.३३%

अमरावती बोर्ड ९५.१४%

मुंबई बोर्ड ९६.५२%

नागपूर बोर्ड ९३.८४%

लातूर बोर्ड ९३.०९%

नाशिक बोर्ड ९३.७३%

कोल्हापूर बोर्ड ९७.६४%

औरंगाबाद बोर्ड (सर्वात कमी) – ९२%

Back to top button