स्वतःच ब्रॅण्डिंग कस करावं?; मिडास इन्स्टिट्यूटतर्फे विशेष कार्यशाळा | पुढारी

स्वतःच ब्रॅण्डिंग कस करावं?; मिडास इन्स्टिट्यूटतर्फे विशेष कार्यशाळा

पुणे : पुढारी ऑनलाईन

सर्वच क्षेत्रात सध्याच्या काळात सतत बदल होत आहे. तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, जागतिकीकरण यामुळे सतत शिकत राहणे व स्वतःला अपडेट करत राहणे ही काळाची गरज बनलेली आहे. यामध्ये विशेषतः नवी डिजिटल कौशल्ये शिकणे, नवमाध्यमाचा पुरेपूर वापर करणे व सॉफ्ट स्किल्स या गोष्टींचा समावेश होतो. आपल्या नोकरी /व्यवसायासाठी लागणारी नवनवी कौशल्ये शिकण्यासाठी वेळ काढणे ही आता काळाची गरज आहे. हीच गरज पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कौशल्यांना नवी झळाळी देण्यासाठी मिडास इन्स्टिट्यूट ऑनलाईन कोर्सेस घेऊन येत आहे.

कळायला सोपी आणि सुटसुटीत अशी विषयांची मांडणी आहे. लाईव्ह क्लास रुम असून ज्यात शंका निरसन करणे सहज शक्य आहे. प्रोफेशनल्स, प्रॅक्टिशनर्स, लघु व मध्यम उद्योजक अशा सर्वांसाठीच कोर्सेस उपलब्ध आहेत. कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता किंवा वयाची अट नाही. कोर्सेसची मालिका पूर्ण करणाऱ्यास विशेष प्रमाणपत्र मिळणार आहे. 

संबंधित बातम्या

स्वतःच ब्रॅण्डिंग करण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करावा, डिजिटल जगात नोकरी मिळवण्यासाठी डिजिटल मीडियाचा वापर कसा होतो याची माहिती देणारी विशेष कार्यशाळा –

आजच्या प्रगत युगामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास निश्चितच लाभ होतो . त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये, तंत्रज्ञानातील सातत्याने होत असलेले बदल आत्मसात करणे आवश्यक आहे.

गुगलची ओळख : गुगल सर्चच्या टिप्स, गुगल रिव्हर्स इमेज सर्च, गुगल ट्रेंड्स, गुगल मॅप्स, गुगल स्कॉलर, गुगल कीप यांची ओळख, युट्यूब : युट्यूबवर स्वतः चे चॅनेल कोणी काढावे व कसे काढावे?

फेसबुक : फेसबुक वापरायचा टिप्स आणि ट्रिक : सी फर्स्ट, ऍक्टिव्हिटी ट्रॅकिंग, डाउनलोड डेटा, सिक्युरिटी सेटिंगस, डेटा प्रायव्हसी इत्यादी, फेसबुकवरची पोस्ट व्हायरल कशी होते? चांगली पोस्ट कशी लिहायची? व्हॉटस्ॲप : टिप्स आणि ट्रिक्स, डेटा सिक्युरिटी, ऑटो डाउनलोड, व्हॉटस्ॲप बिझनेस, पिन, म्यूट/ अन म्यूट इत्यादी , 

ट्विटर : ट्विटर का वापरावे? ट्विटरवर फॉलोअर कसे मिळवावेत? चांगले ट्विट कसे लिहावे? ट्विट व्हायरल कसे होते?

लिंकड इन : लिंकड इन प्रोफाइल कसे बनवावे? लिंकड इन प्रोफाइलवर रेकमेंडशेन्स कशा मिळवाव्यात? लिंकडीनचा नोकरी मिळवण्यासाठी वापर कसा होतो ,

Quora, मिडीयम, टेड, पिंटेरेस्ट, पॉकेट, कोर्सेरा यांची तोंड ओळख, अल्गोरिद्म्स आणि डेटा सिक्युरिटी या सर्वांबद्दल माहिती देणारी प्रख्यात माध्यम सल्लागार विनायक पाचलग यांच्या  ३ तासांच्या  विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

शनिवार ५ सप्टेंबर २०२० संध्याकाळी ५ वाजता झूम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे लाईव्ह लेक्चर असून मार्गदर्शक तुमच्याशी थेट व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधतील. त्याचबरोबर आपल्याला प्रश्न विचारायची देखील संधी असेल. कार्यशाळेचा वेळ ३ तास असून कोर्सची मूळ फी रुपये १००० रुपये इतकी आहे. परंतु आजच्या दिवशी नोंदणी केल्यास विशेष सवलतीची कोर्स फी ५०० रुपये असेल. (सदरची योजना आज दिनांक ५ सप्टेंबर २०२० सायंकाळी ४ वाजेपर्यंत लागू  ) त्याचबरोबर कोर्स पूर्ण झाल्यावर प्रत्येकाला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळेल .

अधिक माहितीसाठी midasinstitute.com/?u_course=स्वतःच-ब्रॅण्डिंग-कस-करावं? या वेबसाईटला भेट द्या, अथवा 8805029845 यावर संपर्क साधा. 

Back to top button