

EPFO KYC Update 2026
नवी दिल्ली : तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे PF (Provident Fund) खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. EPFO ने स्पष्ट केले आहे की, तुम्ही तुमचे PF खाते आधारशी लिंक केले नसेल, तर तुमचे पैसे प्रलंबित राहू शकतात. म्हणजेच, आधार e-KYC केल्याशिवाय PF चे पैसे काढणे, ट्रान्सफर करणे किंवा क्लेम करणे कठीण होईल.
PF ही केवळ एक बचत नसून आपत्कालीन निधी आहे; परंतु अनेक लोक KYC अपडेटकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे नंतर अडचणी येतात. आधार, PAN आणि बँक खात्यासारखे तपशील व्हेरिफाईड असणे आवश्यक आहे, तरच तुमचे खाते सुरळीतपणे कार्यरत राहील, असे EPFO ने स्पष्ट केले आहे.
आता KYC अपडेट करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही हे काम घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या मदतीने ऑनलाइन करू शकता. जर तुम्हीही PF काढण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमचे KYC अपडेट आहे की नाही हे नक्की तपासा.
EPFO ने KYC अपडेटची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली आहे.
सर्वात आधी EPFO च्या Member e-Sewa पोर्टलवर जा आणि तुमचा UAN व पासवर्ड वापरून लॉगिन करा.
लॉगिन केल्यानंतर, “Manage” सेक्शनमध्ये जाऊन “KYC” हा पर्याय निवडा.
येथे तुम्ही तुमचे बँक खाते, PAN आणि आधार यांसारखे तपशील जोडू शकता.
बँक तपशील भरताना IFSC कोड आणि खाते क्रमांक अचूक भरणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल, तो टाकून तुम्ही तपशील सबमिट करू शकता.
एकदा तुम्ही माहिती सबमिट केली की, ती पडताळणीसाठी तुमच्या एम्प्लॉयरकडे (नोकरी करत असलेला विभाग किंवा कंपनी) जाईल.
KYC अपडेट केल्यानंतर लगेच व्हेरिफिकेशन होत नाही. यासाठी साधारणपणे १ ते ७ दिवसांचा वेळ लागू शकतो, एम्प्लॉयरची मंजुरी आणि EPFO च्या प्रक्रियेवर अवलंबून असतो. KYC व्हेरिफाय होताच तुम्हाला मेसेजद्वारे कळवले जाते आणि तुमचे स्टेटस “Verified” दिसू लागते.
EPFO KYC अपडेटसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचा तपशील, मोबाईल नंबर (आधारशी लिंक असलेला)या सर्व कागदपत्रांमधील माहिती जुळणे आवश्यक आहे, अन्यथा तुमचे KYC रिजेक्ट होऊ शकते.
तुम्ही KYC अपडेट केले असेल, तर त्याचे स्टेटस तपासणेही गरजेचे आहे.
यासाठी EPFO पोर्टलवर लॉगिन करा.
“Manage” सेक्शनमधील “KYC” पर्यायावर क्लिक करा.
येथे तुम्हाला “Digitally Approved KYC” सेक्शनमध्ये स्टेटस पाहायला मिळेल.
त्यावरून तुमचे KYC व्हेरिफाय झाले आहे की अद्याप पेंडिंग आहे, हे तुम्हाला समजेल.
तुमचे KYC अपडेट नसेल, तर सर्वात मोठी समस्या ही येईल की तुम्हाला PF चे पैसे काढता येणार नाहीत. तसेचPF क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.PF ट्रान्सफरला उशीर होऊ शकतो. तसेच बँक खाते व्हेरिफाय नसेल तर पैसे अडकू शकतात. त्याचबरोबर कराशी (Tax) संबंधित समस्या येऊ शकतात.