RBI Bank Account Portability: RBI मोठं काम करणार... आता नवीन बँक अकाऊंट नंबर काढायची गरजच नाही; AC No न बदलता बँक बदलता येणार

फ्रॉडपासून सुरक्षा मिळण्यासाठी, परदेशातील पेमेंट फ्रेमवर्क वर्कफोर्स या सुविधा देखील अजून चांगल्या करण्यावर आरबीआयचा फोकस असणार आहे.
RBI Bank Account Portability
RBI Bank Account PortabilityPudhari
Published on
Updated on

rbi bank account portability: रिझर्व बँक ऑफ इंडिया Payment Vision 2028 अंतर्गत बँक ग्राहकांना एक मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. जर आरबीआयचा हा प्लॅन काम करून गेला तर आता मोबाईल सेवेसारखं आपला नंबन न बदलता सर्व्हिस प्रोव्हायडर बदलता येणार आहे. आता आपला बँक अकाऊंट क्रमांक न बदलता दुसऱ्या बँकेत आपलं अकाऊंट स्विच करता येणार आहे. आता हे मोबाईल नेटवर्क बदलण्यासारख सोपं होणार आहे. त्याचबरोबर फ्रॉडपासून सुरक्षा मिळण्यासाठी, परदेशातील पेमेंट फ्रेमवर्क वर्कफोर्स या सुविधा देखील अजून चांगल्या करण्यावर आरबीआयचा फोकस असणार आहे.

RBI Bank Account Portability
Social Media Post Block: संरक्षण, परराष्ट्र अन् गृह मंत्रालयही करू शकणार सोशल मीडिया पोस्ट ब्लॉक.. सरकार मोठ्या तयारीत

बँकिंग आणि पेमेंटमध्ये मोठे बदल होणार?

आरबीआय पेमेंट स्विचिंग सर्व्हिस(PaSS) नावाची एक नवी सिस्टम डेव्हलप करत आहे. हा प्लॅटफॉर्म एका सेंट्रल हब सारखं काम करेल. इथून ग्राहक आपले सर्व पेमेंट्स एकाच जागेवरून पाहू शकतील. तसेच नियंत्रित देखील करू शकतील. याचबरोबर आपल्या अकाऊंटला एका बँकेतून दुसऱ्या बँकेत सहत ट्रान्सफर करू शकणार आहेत. यासाठी त्यांना नवीन अकाऊंट नंबर काढण्याची गरजच उरणार नाही. तसेच अकाऊंट नंबर बदलण्याची देखील गरज भासणार नाही.

म्हणजे जुन्या बँक अकाऊंट नंबरवरच दुसऱ्या बँकेत तुमचे अकाऊंट ट्रान्सफर होणार आहे त्याचबरोबर नवीन सेवा देखील त्यात समाविष्ट होणार आहेत. ही सिस्टम तुमच्या मोबाईल नेटवर्कसारखीच काम करणार आहे. तिथं जसं तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक न बदलता नेटवर्क देणारी कंपनी बदलू शकता तसंच आता बँक अकाऊंट नंबरचं होणार आहे.

RBI Bank Account Portability
Nithin Kamath: "मी मोबाईलवर नेट बँकिंग वापरत नाही!" 'झिरोधा'चे नितीन कामथ यांनी सांगितलं धक्कादायक कारण

अकाऊंट ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया क्लिष्ट

सध्याच्या घडीला अनेक बँक ग्राहकांना बँक अकाऊंट बदलणे खूप अवघड काम वाटते. त्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे. बँक खात्याशी पगार, सबसिडी, इएमआय आणि वीमा अशा सेवा जोडलेल्या असतात. आता पेमेंट ऑटोमेटिक होत असल्याकारणाने दुसऱ्या बँकेत आपलं अकाऊंट ट्रान्फर करणं कठीण होऊन जातं.

RBI Bank Account Portability
Palghar Digital India Issues | सरकारी ओटीपीसाठी 300 रुपयांचा भुर्दंड! पालघरमधील गरिबांना 'डिजिटल इंडिया' पडतेय महाग

आंतरराष्ट्रीय सुविधा देखील सुधारणार

आरबीआय आपल्या Payment Vision 2028 मध्ये अजून एका गोष्टीवर काम करणार आहे. ते आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टम देखील चांगली करण्याची योजना आखत आहेत. आरबीआय सध्याचे नियम आणि तांत्रिक अडचणींचा आढावा घेत आहे. आरबीआय आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टम वेगवान, स्वस्त आणि पारदर्शी करण्यावर काम करत आहे. आरबीआय डिजीटल करंन्सी (CBDC) च्या विस्तारीकरणाने देखील ग्लोबल पेमेंट अजून सहज सुलभ करू शकते.

RBI Bank Account Portability
Cyber Crime Crackdown |सायबर गुन्हेगारांवर केंद्राचा 'डिजिटल स्ट्राईक'! ८३ हजार व्हॉट्सॲप अकाउंट्ससह लाखो सिम कार्ड्स ब्लॉक

ई- चेकवर देखील करणार काम

आरबीआय धानादेश सुविधेवर देखील काम करत असून फसवणूक थांबवण्यासाठी चेकची सुरक्षा, डिझाईन याचे देखील परीक्षण करत आहे. याचबरोबर आरबीआय डिजीटल चेकबाबत देखील चर्चा करणार आहे. आरबीआय ही नवी सुविधा लवकरच आणू शकते. याबाबत सर्व शक्यतांवर विचार होत आहे. इलेक्ट्रॉनिक्स चेक सुरू करण्यावर देखील चर्चा होणार आहे.

RBI Bank Account Portability
RBI New Rules: 1 एप्रिलपासून डिजिटल पेमेंटमध्ये मोठा बदल; RBIने लागू केले नवे नियम, कोणते बदल होणार?

याचबरोबर आरबीआय अजून काही योजनांवर देखील काम करत आहे. तुम्ही कोणत्याही डिजीटल पेमेंट मोडवर होणारी देवाण घेवाण सुरू किंवा बंद करू शकता अशी सेवा आरबीआय आणण्याबाबत आखणी करत आहे. जसं तुम्ही कार्ड कंट्रोल करता तसंच हे काम करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news