Syntex Industries : सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले : तर मग ही बातमी वाचा | पुढारी

Syntex Industries : सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले : तर मग ही बातमी वाचा

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही जर सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे वृत्त आहे. सिंटेक्स इंडस्ट्रीजचे (Syntex Industries) शेअर्स लवकरच घसरण्याची शक्यता आहे. तर, सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या कर्जदारांनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अॅसेट केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्रायजेस यांच्या संयुक्त बोलीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कर्जात अडकलेली सिंटेक्स इंडस्ट्रीज सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे.

याबाबत ब्रोकरेज कंपनी झेरोधाचे संस्थापक आणि सीईओ नितीन कामत यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सिंटेक्सचे (Syntex Industries) शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना सतर्क केले आहे. कामत यांनी म्हटले आहे की, लवकरच या शेअरचे मूल्य घसरण्याची शक्यता आहे. कंपनीचे शेअर्स आज ५ टक्क्यांपर्यंत घसरून ७.८० रुपयांवर बंद झाले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

नितीन कामत यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, काही गुंतवणूकदार अजूनही सिंटेक्सचे शेअर्स विकत घेत आहेत. जरी त्याची स्टॉकची किंमत शुन्यावर जाण्याची शक्यता आहे. हे चिंताजनक आहे. असे अनेक लोक आहेत. जे स्टॉक ५२ आठवड्यांच्या निचांकी पातळीवर असल्यामुळे आणि त्यामागील कारण जाणून घेऊ इच्छित नसल्यामुळे ते शेअर खरेदी करत आहेत.

सिंटेक्स इंडस्ट्रीजने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिझोल्यूशन प्लॅननुसार अॅसेट केअर आणि रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझ लि. सह संयुक्तपणे, कंपनीचे विद्यमान भाग भांडवल घसरेल. आणि कंपनी स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसईमध्ये हस्तांतरित केले जाईल. एनएसईमधून काढून टाकले जाईल. सिंटेक्सच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्स (सीओसी) ने आरआईएल आणि एसीआरईच्या ठराव योजनेच्या बाजूने एकमताने मतदान केले आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

Back to top button