

अकोला; पुढारी वृत्तसेवा : आपल्या १३ महिन्यांच्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या करून आईने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री बाभूळगाव येथे घडली. घरातील इतर व्यक्तींच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सदर महिलेस अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या बाभूळगाव येथील प्रियंका बोबडे या महिलेने सोमवारी रात्री आपल्या १३ महिन्याच्या मुलीची गळा दाबून आधी हत्या केली. त्यानंतर तिने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना घरातील इतर व्यक्तींच्या लक्षात येताच त्यांनी त्या महिलेला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस करत आहेत.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie