मानदुखीवर इंजेक्शनचा उपाय | पुढारी

मानदुखीवर इंजेक्शनचा उपाय

बदलत्या जीवनशैलीमुळे मणक्याची झीज व घर्षण होते. त्याचा परिणाम म्हणून हातात वेदना होतात. मानदुखीत हाताचा खांदा दुखतो, हातामध्ये किंवा दंडामध्ये वेदना होतात. खांद्यापासून बोटांपर्यंत दुखू लागते. बोटांना मुंग्या येऊन बधीरपणा येतो. त्याची तीव्रता वाढली की, हातांमधील ताकदही कमी होते. संवेदना होतात, याचाच अर्थ मानदुखी.

रोजची कामानिमित्त होणारी धावपळ, दुचाकीचा वाढलेला वापर, खराब रस्ते आणि तासन्तास चुकीच्या पद्धतीने बसून काम करायची सवय यामुळे हल्ली मानेचे दुखणे वाढत आहे. भरधाव वाहन चालविण्याची सवय, वाहन चालविताना खांदा व मान यामध्ये मोबाईल पकडून बोलण्याची सवय तसेच रस्त्यावरील खड्डे यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीतीने मानेच्या आजारांनी डोके वर काढल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञ नोंदवितात.

मानदुखीची कारणे काय?

प्रत्येक व्यक्ती धकाधकीचे जीवन जगत आहे. दररोज ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर सातत्याने काम करावे लागत आहे. साहजिकच थोडे वाकून काम केले जाते. शिवाय व्यायामाचा अभाव, बैठे काम, चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे व मोबाईलचा वाढता वापर यामुळे मानेचे आजार बळावत चालले आहेत. झोपून टीव्ही पाहणे, वाचन करणे, मोबाईल वापरणे, सोफ्यावर टीव्ही पाहत झोपणे, झोपताना उंच उशी किंवा 2-3 उशा तक्क्या घेऊन झोपणे आदी कारणांमुळे मानदुखीचे रुग्ण वाढत आहेत. ही झाली जीवनशैलीमुळे असणारी मानदुखीची कारणे.

वैद्यकीय भाषेमध्ये मानदुखीची कारणे

1) स्पाँडिलॉसिस (spondylosis) – दोन मणक्यांच्यामध्ये असणार्‍या चकतीची वयोमानानुसार होणारी झीज. 2) स्पाँडिलोलायसिस (spondylosis)  – मणक्यामधील फ्रॅक्चर. 3) स्पाँडिलोलिस्थेसिस (spondylosis) – एक मणका दुसर्‍या मणक्यावर सरकणे. 4) स्पाँडिलायटिस (spondylosis) ) – मणक्याला आलेली सूज. ही झाली मानेच्या चकतीविषयीची कारणे. मानदुखीची इतरही कारणे आहेत.

उदा. मानेशेजारच्या स्नायूंना येणारा आकुंचनचा झटका र्(ाीीलश्रश ीरिीा) मानेची चकती जागेवरून बाहेर सरकणे, मानेमध्ये जन्मतः जादा कुर्चा असणे, ट्रपेझिअस नावाचा स्नायू काही कारणांमुळे आंकुचन पावणे, थोरॅसिक आऊटलेट सिंड्रोम, फायब्रोमायल्जिया या सर्व कारणांमुळे जेव्हा हात दुखू लागतो, तेव्हा त्या आजाराला वैद्यकीय भाषेत ब्रॅकिअल्ज्यिा (इीरलहळरश्रसळर) म्हणतात.

थोडक्यात, बदलत्या जीवनशैलीमुळे मणक्याची झीज व घर्षण होते. त्याचा परिणाम म्हणून हातात वेदना होतात. मुंग्या येतात किंवा हातात बधीरपणा जाणवू लागते. मानदुखी, हाताचा खांदा दुखणे, हातामध्ये किंवा दंडामध्ये वेदना होतात. खांद्यापासून बोटांपर्यंत दुखू लागते. बोटांना मुंग्या येऊन बधीरपणा येतो. त्याची तीव्रता वाढली की, हातांमधील ताकदही कमी होते. संवेदना होतात, याचाच अर्थ मानदुखी. मानेच्या मणक्याचा आजार. हा आजार कोणत्याही जंतू, विषाणू अथवा रोगामुळे होत नाही, तर हा ‘बदलत्या जीवनशैलीचा आजार’ म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जात आहे. या आजारावर मणकाविकार विशेषतज्ज्ञ, पेन फिजिशियन व फिजिओथेरपीस्ट या सर्वांचा सल्ला अतिशय महत्त्वाचा ठरतो; पण आजार वाढविणे वा नियंत्रणात आणणे हे सर्वस्वी रुग्णाच्या हातात आहे. हा आजार प्रामुख्याने तरुणवर्गात जास्त प्रमाणात आढळून येत आहे.

उपचार

मणकाविकार विशेषतज्ज्ञ या आजारावर उपचार करतात. रुग्णाची सर्व माहिती, दैनंदिन जीवनशैलीचे स्वरूप माहीत करून घेतले जाते. जरूर असेल तर रक्ताच्या तपासण्या, एक्स-रे, एमआरआय केला जातो. आजाराच्या स्वरूपानुसार गोळ्या, औषधे व पट्टा दिला जातो. सोबत फिजिओथेरपीस्ट काही व्यायाम सांगतात.

नियमित गोळ्या, औषधे व व्यायाम केला तर दुखणे निश्चितच कमी होते. सोबत सुधारित जीवनशैली, मोबाईल व दुचाकीचा कमीत कमी वापर, जास्त वेळ एकाच स्थितीत बसून अथवा उभे राहून काम न करणे, दर 30 मिनिटांनी 5 मिनिटांचा ब्रेक घेणे, झोपताना खूप उंच उशी अथवा तक्क्या न वापरणे, झोपून टीव्ही अथवा मोबाईल न पाहणे, कॉम्प्युटरची उंची मानेच्या रेषेत असणे, जास्त वाकून काम न करणे आदी सूचना तंतोतंत पाळल्या व सोबत धनुरासन, नवखासन, भुजंगासन यांसारखी योगासने केली तर दुखणे निश्चितच आटोक्यात येऊ शकते.

बर्‍याचदा दुखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. वरील सूचना तितक्या सिरीअसली घेतल्या जात नाहीत. अशावेळी दुखणे बळावते व ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. अशावेळी भूलतज्ज्ञ डॉक्टर ज्यांनी पेन मॅनेजमेंटचे स्पेशल प्रशिक्षण घेतले आहे, ते पेन ब्लॉकचे इंजेक्शन देतात.
पेन ब्लॉक हे अद्ययावत तंत्र आहे. शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित व अमेरिका युरोपमध्ये हे अतिशय प्रचलित असे तंत्रज्ञान आहे.
याचेही प्रकार आहेत. आजाराचे स्वरूप पाहून अचूक निदानासाठी निदानसूचक इंजेक्शन (डायग्नोस्टिक पेन ब्लॉक) व नंतर उपचारात्मक पेन ब्लॉक (थेरप्युटिक पेन ब्लॉक)चे इंजेक्शन दिले जाते. असे इंजेक्शन ऑपरेशन थिएटरमध्ये ‘सी’ आर्म/इमेज अन्टेसिफाईंग टीव्ही सिस्टीम (खखढत) मध्ये पाहून, खात्री करून दिले जाते. याचे इपिड्युरल पेन ब्लॉक, फॅसेट ब्लॉक, ट्रान्स्फोरामिनल ब्लॉक असे प्रकार आहे. आजाराचे स्वरूप पाहून प्रकार निश्चित केला जातो.

या इंजेक्शननंतर वेदनाशमन 3 ते 6 महिने, काही वेळा वर्षभर राहते, सोबत व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. हे इंजेक्शन नसेच्या आवरणावर, जॉईंटमध्ये देण्यात येते. त्यामुळे सूज कमी येते. हे नवीन टेक्निक आहे. असे इंजेक्शन हा एकमेव उपचार नाही. खूपदा आजार खूपच बळावलेला असतो व ऑपरेशनशिवाय इलाज नसतो. पण रुग्णाची, रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिक तयारी नसते. आर्थिक बाजूही भक्कम नसते. अशावेळी असे इंजेक्शन घेऊन काही काळ वेदनाशमन केले जाऊ शकते. या अवधीमध्ये रुग्णाची मानसिक तयारी होऊ शकते व आर्थिक बाजूही भक्कम करायला वेळ मिळतो. मग न घाबरता आत्मविश्वासाने ऑपरेशनला सामोरे जाता येते व रिझल्टही उत्तम मिळतात.

  • डॉ. आरती जाधव

Back to top button