अचानक वजन घटलंय?, जाणून घ्या वजन कमी होण्यामागची कारणे | पुढारी

अचानक वजन घटलंय?, जाणून घ्या वजन कमी होण्यामागची कारणे

आपले वजन अचानक कमी होत आहे काय? कोणत्याही व्यायामाशिवाय किंवा विशेष आहाराशिवाय वजन कमी झाले आहे का? या प्रश्नांचे उत्तर होय असेल तर आपले आरोग्य एखाद्या आजाराचा सामना करत असल्याचे समजावे. हा आजार कदाचित गंभीर असू शकतो किंवा काही उपचारांच्या आधारे यावर तोडगाही निघू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अचानक वजन कमी होण्यामागचे कारण समजून घ्यायला हवे. कोणत्याही व्यायामाशिवाय किंवा आहाराशिवाय वजन अचानक कमी होत असल्याचे जाणवत असेल तर तो शरीरातील बायोलॉजिकल इकोसिस्टिममध्ये असंतुलन होण्याचा परिणाम असू शकतो. हे काहीवेळा अशक्तपणाचे लक्षण देखील राहू शकते. अशा वेळी डॉक्टरांशी संपर्क करायला हवा.  कोणत्याही व्यक्तीचे वजन कमी किंवा जास्त करण्यासाठी काही घटक कारणीभूत असतात आणि त्यात कॅलरी, डिफरंट डायट, फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आणि मानसिक आरोग्य आदी गोष्टींचा समावेश आहे.

कधी घबरदारी घ्यावी?

6 ते 12 महिन्यांत आपले वजन 5 टक्क्यांपेक्षा अधिक कमी झाले असेल तर डॉक्टराची भेट घेऊन वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्यात आणि वजन कमी होण्यामागचे कारण शोधावे. विशेष म्हणजे आपले वय 21 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि चांगला आहार घेत असूनही शरीरात फारसा फरक पडत नसेल किंवा आपले वजन चिकन, मटण यासारख्या हायप्रोटीन पदार्थांचे सेवन करूनही कमी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.

वजन कमी होण्यामागची कारणे

वजन अचानक कमी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. हायपरथायरॉयडिज्म, मधुमेह, स्ट्रेस, कर्करोग, सीओपीडी, हृदयविकार, डिमेंन्शिया यासारख्या गोष्टींमुळे वजन कमी होण्याची शक्यता राहते.

मधुमेह ः मधुमेहात वजन वाढण्याबरोबरच अनेकांचे वजनदेखील कमी झाल्याचे आपल्याला निदर्शनास येईले. शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन नसल्याने कोशिका या ऊर्जेसाठी चरबी आणि स्नायूचा उपयोग करण्यास सुरुवात करतात. परिणामी वजन कमी होऊ लागते. या कारणामुळे बहुतांश लोक ही उपाशी आणि तहानलेले राहतात.

हायपर-थायरॉयडिजम ः हायपर-थायरॉयडिजमच्या स्थितीत जेव्हा शरीरात गरजेपेक्षा अधिक थॉयराईडच्या हार्मोनचे उत्पादन होते तेव्हा शरीरातील मेटाबॉलिज्म (चयापचय) हे अधिक कॅलरी बर्न करण्यासाठी वाढते आणि परिणामी कोणत्याही प्रयत्नांशिवाय वजन कमी होऊ लागते. या व्यतिरिक्त वारंवार शौच आणि बाथरूमला जावेसे वाटते. हृदयाचे ठोके देखील वाढतात.

स्ट्रेस ः तणाव म्हणजेच स्ट्रेस झाल्याने हार्मोन ट्रिगर होतो. तो गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अ‍ॅक्टिव्हिटी आणि चयापचयाच्या गतीवर परिणाम करतो. तणाव वाढल्याने भूक, तहान आणि निद्रानाशाचा त्रास होतो. या कारणांमुळे वेगाने वजन कमी होऊ लागते.

कार्डियॅक कॅचेक्सिया ः कार्डियॅक कॅचेक्सियाच्या स्थितीत शरीरात चरबी, स्नायू आणि हाडांची झीज अधिक प्रमाणात होऊ लागते. यामागचे कारण म्हणजे आहारातून पोषक तत्त्व न मिळणे. सातत्याने ही स्थिती राहिल्यास कालांतराने आपले वजन वेगाने कमी होऊ

लागते. डिमेन्शिया ः कोणत्याही कारणांमुळे वजन कमी होण्याचे कारण हे डिमेन्शिया देखील असू शकते. या आजारात विचारसरणीची क्षमता कमी होते आणि वजनही कमी होऊ लागते. काही वेळा व्यक्ती जेवायला विसरतो किंवा गिळणे आणि चावण्यास अडचण येऊ लागते. याएका अभ्यासानुसार, डिमेन्शियाचा त्रास सहन करणार्‍या 2-3 रुग्णांपैकी एकाचे वजन अचानक कमी होऊ लागते.

डॉ. संजय गायकवाड

Back to top button