लघवीची ‘ही’ सवय करेल तुमच्‍या आरोग्‍यावर परिणाम

लघवीची ‘ही’ सवय करेल तुमच्‍या आरोग्‍यावर परिणाम
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिवसभरात तुम्‍हाला किती वेळा लघवीला जावं लागतं, याचा विचार आपण धावपळीच्‍या जगण्‍यात करत नाही. लघवीची सवय तुमच्‍या आराेग्‍यावर परिणाम करते. कामातील व्‍यस्‍त असणे किंवा अन्‍य काही कारणांमुळे तुम्‍ही लघवीला जाणं थांबवत असाल तर याचे गंभीर परिणाम आरोग्‍यावर होतात.तज्‍ज्ञांच्‍या मते काहीजण गरजेपेक्षा अधिकवेळा लघवी ची सवयच लावून घेतात ही सवयही मूत्राशयाच्‍या आरोग्‍यावर दुष्‍परिणाम करते. दिवसभरात किती वेळा लघवी होणे ही सामान्‍य बाब आहे हे पाहूया…

आपण बर्‍याचवेळा कामात एवढे व्‍यस्‍त असतो यामुळे नकळत आरोग्‍याकडे दुर्लक्ष होते. अवेळी जेवण, भूक लागली तरी जेवण टाळणे, चहा-कॉफीसारखी पेय घेत झोप टाळणे या सवयी जगण्‍याचा भाग होतात. अपवादात्‍मक परिस्‍थितीत तुम्‍ही लघवी (मूत्रविसर्जन) टाळणे तर तात्‍काळ दुष्‍परिणाम होत नाहीत. मात्र तुम्‍ही सातत्‍याने लघवीला जाणे टाळत असला तर यांचे गंभीर परिणाम तुमच्‍या आरोग्‍यावर होतात, असे मूत्रविकार तज्‍ज्ञांच्‍या संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे.

लघवीच्‍या सवयीचा  परिणाम मूत्राशयावर होताे. उदाहरणार्थ तुम्‍ही जर दर एका तासानंतर मूत्रविसर्जनाला जाण्‍याची सवय लावली तर तुमचे मूत्राशय तेवढेच संवेदनशील होते.

कमी प्रमाणात लघवी होणार असली तरी सवयीमुळे मूत्राशय तुम्‍हाला लघवीला जाण्‍याचा सिंग्‍लन देते. दर तासाला लघवीला जाण्‍याची सवयच लागते, असे इंग्‍लंडमधील रॉयल कॉलेजचे प्रा. स्‍टेरगिरोस डौमॉचटिस यांनी आपल्‍या संशोधनात म्‍हटले आहे.

  • ऑलिम्पिक पदकवीर श्रीजेश याचा धोतर, शर्ट व १००० रुपये देऊन सत्कार
  • BigBoss OTT : प्रतीकने ओलांडली होती मर्यादा, म्हणूनच 'असं' – शमिताचा खुलासा

सतत लघवीला जाण्याची सवय लागू शकते

कोरोना काळापासून वर्क फार्म होम सुरु आहे. घरामध्‍ये टॉयलेट सहज उपलब्‍ध होते. यामुळे सातत्‍याने लघवीला
जाण्‍याची सवय लागू शकते. तसेच पुरुषांपेक्षा महिलांचे घरात राहण्‍याचे प्रमाण अधिक आहे.

स्‍वयंपाक करतानाही त्‍यांच्‍या समोर पाणी असतेच त्‍यामुळे महिला पाणी अधिक पीत असल्‍याचेही निरीक्षण आहे. त्‍यामुळे महिलांना ही सवय लागण्‍याची शक्‍यता अधिक असते, असे प्रा. स्‍टेरगिरोस डौमॉचटिस यांनी आपल्‍या संशोधनात नमूद केले आहे.

अधिक पाणी पिणेही आरोग्‍यासाठी हानीकारक

अधिक पाणी सेवन हे आरोग्‍यास हानीकारक ठरते. अधिक पाणी पिल्‍यामुळे वारंवार लघवीला जावे लागते.

लहान मुलांचही बिछान्‍यात लघवी होवू नये यासाठी पालकही मुलांना रात्री झोपण्‍यापूर्वी लघवीला जाण्‍याची सवय लावतात. बिछान्‍यात लघवी होणे ही अत्‍यंत चुकीचे असल्‍याचे मुलांच्‍या मनावर बिंबवलं जातं.

मुलांना लहानपणीच मूत्राशय रिकामे ठेवण्‍याची सवयच लागते. अशा सवयीमुळे तुमचे मूत्राशय अत्‍यंत सवंदेशनील होते. त्‍यामुळे वारंवार लघवीला जाणे हा सवयीचा भागच होतो, असे निरीक्षणही डॉ. प्रा. स्‍टेरगिरोस यांनी नोंदवले आहे.

तुम्‍ही सर्वप्रथम किती प्रमाणात पाणी पिता हे तपासा. अति आणि कमी यामधील कोणतेही सवय ही घातकच ठरते. त्‍यामुळे पाणी पिण्‍यास संतुलन राखणे फार महत्‍वाचे आहे.

सर्वसाधारणपणे दिवसभरात तुम्‍ही दीड ते दोन लीटर पाणी पिणे आरोग्‍यासाठी आवश्‍यकच असते. तसेच तुम्‍ही व्‍यायाम करत असाल तर तीन लीटर पाणी पिणे गरजेचे असते.

तुमचे वास्‍तव्‍य असलेल्‍या प्रदेशाच्‍या हवामानावरही शरीराची पाण्‍याची गरज बदलते. त्‍यामुळे आरोग्‍यासाठी चांगले म्‍हणून अति पाणी पिणेही आरोग्‍यास हानीकारक ठरते. जे लोक अतिरिक्‍त पाणी पितात त्‍यांना वारंवार लघवीला जावे लागते. कालांतराने शरीरालाही ती सवयच होते. त्‍याचदुष्‍परिणाम आरोग्‍यावर होतो.

निरोगी व्‍यक्‍ती सर्वसाधारणपणे दर तीन तासांनी लघवीला जातो. तर दिवसभरात साधरण सातवेळा लघवीला जाणे हे सामान्‍य आहे. मात्र यापेक्षा अधिकवेळा लघवीला जाणे हा तुमच्‍या सवयीचा भाग असू शकतो.त्‍यामुळे विनाकारण लघवीला जाणे थांबवा. जर कार्यालय किंवा घरात असाल तर दर तीन तासांनी लघवीला जाणची सवय लावा, असेही प्रा. स्‍टेरगिरोस डौमॉचटिस सूचवतात.

तुम्‍ही अधिक काळ लघवी थांबवूही नका, याचाही मोठा दुष्‍परिणाम मूत्राशयावर होवू शकतो, असेही ते नमूद करतात.

सातत्‍याने लघवीला जाण्‍याच्‍या सवयी टाळण्‍यासाठी कॅफीनयुक्‍त द्रव्‍यपदार्थ, मद्‍य सेवन, आम्‍लयुक्‍त फळांचे सेवन टाळावे असा सल्‍लाही ते देतात.

सतत लघवीला होण्‍यागामील कारणे काय असतात?

संशोधनानुसार एक निरोगी व्‍यक्‍त दिवसभरात साधरण ४ ते सातवेळा लघवीला जाणे हे सामान्‍य आहे. मात्र दररोज तुम्‍ही अधिकवेळा लघवीला जात असला तर तुम्‍हाला तुमची जीवनशैली तपासवी लागेल.

तुमचे वय, तुम्‍ही घेत असलेली औषधे, मधुमेह इत्‍यादी बाबींवरही लघवीचे प्रमाण अवलंबून असते. तसेच गर्भावस्‍था आणि प्रसूतीनंतर काही आठवडे लवघी होण्‍याचे प्रमाण वाढते.

मधुमेह असेल तर रक्‍तामधील अतिरिक्‍त सारखेच्‍या प्रमाणामुळेही लघवीला अधिकवेळा होते.

त्‍याचबरोबरी शरीरातील कॅल्‍शिअमचे प्रमाण कमीअधिक झाले तरीही याचा परिणाम मूत्रविसर्जनावर होतो. तसेस यूरिन इनफेक्‍शनमुळेही लघवीचे प्रमाण वाढते. तसेच लघवी करताना जळजळ होते.

एुकणच लघवी आणि आरोग्‍य यांचा थेट संबंध असल्‍याने याबाबत या सवयीबाबत योग्‍य काळजी आराेग्‍यासाठी महत्त्‍वपूणर्ण ठरते.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडीओ :गायी पाळणाऱ्या मुंग्यांची गोष्ट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news