#Sanjay Raut: चुकीचा इव्हेंट कसा करावा हे तुमच्याकडून शिकावे

#Sanjay Raut: चुकीचा इव्हेंट कसा करावा हे तुमच्याकडून शिकावे
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: 'चूक झाल्यानंतर तिचा इव्हेंट कसा करावा आणि चूक सुधारल्यानंतर त्याचा उत्सव कसा करावा हे तुमच्याकडून शिकायला हवे. एवढा आत्मविश्वास तुमच्याकडे कुठून येतो? असा टोमणा खासदार संजय राऊत  #Sanjay Raut यांनी राज्यसभेत हाणला.

ते १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकांवर चर्चेदरम्यान बुधवारी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी सरकारच्या धोरणांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

#Sanjay Raut म्हणाले, 'चूक झाल्यानंतर तिचा इव्हेंट कसा करावा आणि चूक सुधारल्यानंतर त्याचा उत्सव करण्याचाही इव्हेंट कसा करावा, हे सरकारकडून शिकायला हवं.

चुकीचाही उत्सव आणि चूक सुधारण्याचाही इव्हेंट, एवढा कॉन्फिडन्स सरकारकडे येतो कुठून? हा एवढा आत्मविश्वास येतो कुठून.

त्याची आम्हाला गरज आहे. थोडासा आम्हालाही उधार द्या.'

तेव्हा का पाठ थोपटून घेतली

२०१८ मध्ये १०२ व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागास आयोगाला अधिकार दिल्यामुळे सर्व राज्यांचे अधिकार केंद्राला आले.

तेव्हाच सगळ्यांनी इशारा दिला होता की इतके सगळे अधिकार तुम्ही एका केंद्रीय आयोगाला देऊ नका.

पण सरकारने तेव्हा चूक केली होती आणि चूक झाल्यानंतर देखील सरकार आपलीच पाठ थोपटत होतं.'

आमच्या हातात तागडी नव्हती

राऊत #Sanjay Raut म्हणाले, 'महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आपल्या हातात नेहमीच देशाच्या संरक्षणासाठी तलवार, बंदूक होती आणि आहे. संरक्षण हेच आमचं काम होते.

आमच्या हातात कधी तागडी-तराजू नाही आला, ना कधी चोपडी आली. आम्ही नेहमी लढत राहिलो. सामाजिक न्यायाची अपेक्षा ठेऊन आम्ही आज उभे आहोत.

राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात सामाजिक न्यायाचे पाऊल देशात सर्वात आधी पाऊल उचलले होते.

१२७व्या घटनादुरुस्तीचं विधेयक अर्धवट आहे. या विधेयकात दुरुस्तीनंतर देखील आरक्षणावर ५० टक्क्यांची जी मर्यादा आहे ती ३० वर्षांपूर्वीची आहे.

ती वाढवली नाही, तर आज दुरुस्ती केली आहे, उद्या अजून काही बदल केला जाईल, ' असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news