बॅलन्स ब्रेन | पुढारी | पुढारी

बॅलन्स ब्रेन | पुढारी

साक्षी तापीकर

आपला मेंदू हा दोन गोलार्धात विभागलेला आहे. डाव्या आणि उजव्या मेंदूच्या प्रत्येक गोलार्धाची स्वतःची बलस्थाने आहेत.  उजव्या हाताची बोटे डाव्या मेंदूच्या कार्याचे प्रतिनिधित्व करतात आणि डाव्या हाताची बोटे उजव्या मेंदूच्या कार्याचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक बोट विशिष्ट प्रज्ञा व बुद्धिमतांना प्रतिबिंबीत करते. प्रत्येक बुद्धिमतेला विशिष्ट वेटेज (मूल्य) आहे. कारण मूल हे आईच्या गर्भात वाढत असताना साधारणतः 13 ते 21 आठवड्याच्या कालावधीत बाळाच्या मेंदूच्या विकासाबरोबर हाताच्या बोटांच्या ठशांचा विकास होत असतो. म्हणजेच हे दोन्ही विकास एकाच वेळी होत असतात.  

1981 मध्ये डॉ. रॉजर स्पेरी यांना विभाजीत मेंदू सिद्धांताच्या संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कार देण्यात आला. अभ्यासामध्ये असे आढळले की, डावा आणि उजवा मेंदू विविध कामांमध्ये विशेष असतात तसेच मेंदूच्या रचनेत लहान मेंदू आणि मोठा मेंदू ही सामान्यपणे प्रचलित विभागणी आहे.  तथापि मेंदू हा पाच लोबमध्ये विभाजीत असून प्रत्येक लोबची कार्यशीलता विशिष्ट आहे, ती कशी ते आपण पाहू या- 

1) प्री फ्रॅान्टल लोब ः- व्यक्तीची वर्तणूक, व्यक्तिमत्त्व, निर्णय क्षमता आंतरज्ञान, आंतर वैयक्तिक, विवेक बुद्धी, चांगला / वाईट या विषयीचे विचार इ. गोष्टी या लोब्ज मध्ये समाविष्ट असतात.  

2) फ्रॅान्टल लोब ः- समस्या सोडवणे, गणना, तर्क, लॉजिकल विचार, विश्लेषण, संशोधन, सांख्यिक खेळ, वैज्ञानिक विचार, भावना, नियंत्रण, राग, विज्ञान इ. सर्व गोष्टी या फ्रॉन्टल लोबचा भाग आहेत. 

3) परायटल लोब ः- स्पर्शज्ञान, भेद, मोटार स्किल्स, चित्रकला, खेळणे, डाव्या आणि उजव्यातील फरक, लेखन, शरीराच्या प्रत्येक भागाची जाणीव, नेत्रहस्त समन्वय इ. गोष्टी परायटल लोबचे वैशिष्ट्य आहे.  

4) टेम्पोरल लोब ः- कल्पना करणे, रंग ओळखणे, संगीतविषयक भावना, भाषा, शब्द वाचन, लेखन, भाषण, द़ृश्य मेमरी, आकार, सूर, ओळख, आवाज इ. महत्त्वाच्या गोष्टी हे टेम्पोरल लोबचे काम समजले जाते. आपण भाषा ऐकत असतो तेव्हा टेम्पोरल लोबचे सहकार्य आपल्याला होत असते. हा टेम्पोरल लोब दोन्ही अर्धगोलांमध्ये असतो. तसेच ऐकलेले समजून घेण्याचे काम ही चालू असते. उदा. आपण जर एखादे गाण ऐकत असू तर भाषा, त्यातील संगीत, गाण्यातील भावना, त्यातून आपल्या मनासमोर उभं राहणारे काल्पनिक चित्र या सार्‍याचा मेळ साधला जातो व डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही अर्धगोलातील केंद्रांना जास्तीत जास्त काम मिळते.  

5) ऑसिपीटल लोब ः- चेहरा लक्षात ठेवणे, एकाग्रता, लक्ष, शब्दांकन, अल्पकालीन / दीर्घकालीन बुद्धिमता, कमी किंवा जास्तीची ओळख, लैंगिक वर्तन, वास घेण्याची क्षमता, आक्रमकता इ. मुख्य कार्य हा लोब करत असतो.  

येथे डाव्या आणि उजव्या मेंदूचे मोजमाप आपल्या TRC (Total Ride Count)  मूल्यावर अवलंबून असते. जिथे आधिक TRC मूल्य तिथे न्यूरॉन्सची अधिक संख्या असून ते शिक्षण क्षमता व अ‍ॅक्टिव्हनेस दर्शवतात. मेंदूची तुलनात्मक टक्केवारी TRC व्हॅल्यूवरून मोजता येते. यासाठी तसेच आपल्यातील पाच लोबचे मूल्य जाणून घेण्यासाठी Dermatoglyphics ही चाचणी मार्गदर्शक ठरते.  

शालेय जीवनात असताना मूलांच्या मेंदूला दर क्षणाला नवीन खुराक हवा असतो; परंतु तसे होताना मात्र दिसत नाही. कारण विचार करण्याचे काम मुलांना फारसे करू दिले जात नाही. फक्त बघा, वाचा, लिहा, पाठ करा इ. गोष्टींवर फोकस अधिक केला जातो.  

डाव्या मेंदूला लॉजिक आणि कॅलक्युलेशन जास्त कळते. जर मुलांचा डावा मेंदू जास्त क्रियाशील असेल तर अशी मुले अ‍ॅनालिटीकल असतात.  एखादी समस्या सोडवायची झाली तर ते त्याकडे लॉजिकली पाहतात. त्यावेळी त्यांचा फ्रॅान्टल लोब जास्त सक्रिय होतो. अशी मुले प्रॅक्टिकल असतात. याउलट उजवा मेंदू हा क्रिएटिव्ह असतो. तो थ्री डायमेंन्शनल सेन्स नियंत्रित करतो.  अशावेळी त्यांना परायटल लोबचे सहकार्य मिळते. जर मुलांचा उजवा मेंदू जास्त क्रियाशील असेल तर ही मुले जास्त भावुक असतात. नव्वद टक्के लोक हे डाव्या मेंदूचाच जास्त वापर करतात. मुलांची अपेक्षीत प्रगती साधायची असेल तर काही नैसर्गिक क्लृप्त्या वापरून पूर्ण मेंदू विकसित करता येेऊ शकतो. हे उपाय आपण मुलांकडून लहान वयापासूनच करून घेतले पाहिजेत. त्यासाठी मुलांच्या मेंदूला व्यायाम द्यावा. व्यायाम देण्यासाठी आपण मुलांचे काही ब्रेन गेम्स घेऊ शकतो. मुलांकडून शब्दकोडी सोडवून घेणे, त्यांच्याबरोबर बुद्धिबळ खेळणे, सुडोकू अशा गोष्टी करता येतील. जी मुले उजव्या हाताचा वापर करणारी आहेत त्यांच्याकडून डाव्या हाताने काम करून घेतले पाहिजे  व जी मुले डाव्या हाताचा वापर करतात त्यांच्या उजव्या हाताने काम करून घेतले पाहिजे. उदा. लिहिण्याचा प्रयत्न करणे, ब्रश करणे, बटण लावणे इ. तसेच मुलांना वेगवेगळ्या भाषा, वाद्य, डान्स शिकवणे, तसेच अभ्यासामध्ये शिकवताना संगीत, रंगीत चित्रे, आकृत्या, नकाशे यावर भर देणे इ. उदाहरणे देता येतील.  

पूर्ण मेंदू वापरण्याची शंभर टक्के क्षमता असताना केवळ वाचन, लेखन करायला मुलांना सांगितले तर त्याने मेंदूला क्षीण येतो व तो लवकर थकतो. हेच मुलांना वरील माध्यमातून शिकवले तर त्यांना एकदम फ्रेश वाटते. मेंदूला थकवा येत नाही. कारण हे एकप्रकारे बौद्धिक टॉनिक आहे. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता ही जन्मापासूनच ठरलेली असते; परंतु मुलांना लहानपणापासून मेंदूच्या डाव्या उजव्या भागातील केंद्रांचा पद्धतशीर वापर करायला शिकवले तर ती मुले ‘बॅलन्स ब्रेन चाईल्ड’ बनतात. त्यामुळे शिक्षणाचा खरा अर्थ म्हणजे मुलांच्या मेंदूच्या दोन्ही बाजूंचा जास्तीत जास्त वापर करायला लावणारे शिक्षण असा होय. यालाच मानसशास्त्रीय भाषेत ‘होल ब्रेन मॅपिंग’ म्हणतात. यासाठी Multipule Intelligence वर आधारीत असलेली Dermatoglyphics ही चाचणी वापरणे हिताचे ठरते.  कारण DMIT ही एक परिपूर्ण आत्मचिकित्सा आहे, ज्याच्या आधारावर लहान मुलांच्या व्यक्तिमवाच्या अनेक बाबी अगोदरच कळू शकतात.

Back to top button