मुलांना काय खायला द्यावे आणि काय नको?   | पुढारी

मुलांना काय खायला द्यावे आणि काय नको?  

डॉ. प्राजक्ता गायकवाड 

आपण कधी विचार केला आहे का, की आपण मुलांना जे बेकरी प्रोडक्डस्, नुडल्स, कुरकुरे, कोल्ड ड्रिंक्स देतो, त्यामध्ये काय काय घटकद्रव्ये असतात आणि शरीरावर त्यांचे काय बरे-वाईट परिणाम घडतात? हे त्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे? मुलांची फक्त भूक भागवणे गरजेचे आहे, की त्यांना पौष्टिक आहार देऊन त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ होणे आवश्यक आहे, याचा विचार व्हायलाच पाहिजे.

कित्येक मुलांचे आई-वडील नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. त्यामुळे मग त्यांच्या माता वेळेअभावी मुलांना खपीींरपीं षेेवी (छेेवश्रशी, चरससळश,इळीर्लीळीं) देतात; पण हे त्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे? मुलांची फक्त भूक भागवणे गरजेचे आहे की त्यांना पौष्टिक आहार देऊन त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ होणे आवश्यक आहे, याचा विचार व्हायला पाहिजे. 

प्रत्येक पाल्याच्या आई-वडिलांना वाटत असते आपला पाल्य शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सदृढ असावा. त्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात. कित्येक पाल्यांच्या त्यांच्या मुला-मुलींविषयी तक्रारी असतात. हा काही खातच नाही किंवा वरचेवर थोडे थोडे खातो. त्याला काही ढेपळल किंवा भुकेचे औषध द्यावे का? डॉक्टर म्हणून आपण काही तरी सल्ला द्यावा, अशी त्यांची अपेक्षा असते. बर्‍याच वेळा पेशंटच्या घाईत आपण त्यांना एखादे अिशिींळूशी देऊन पाठवून देतो; पण हे त्यांच्या शंकेचे निरसन आहे का? याचाच विचार करून यावर थोडे सविस्तर लिहिण्याची कल्पना सुचली.

आपण कधी विचार केला आहे का, की आपण मुलांना जे बेकरी प्रोडक्डस्, नुडल्स, कुरकुरे, कोल्ड ड्रिंक्स देतो, त्यामध्ये काय काय घटकद्रव्ये असतात आणि शरीरावर त्यांचे काय बरे-वाईट परिणाम घडतात? आजच्या आधुनिक संगणकीय युगात मुलांमध्ये व्यायामाचा अभाव आहे. र्उेािीींशी ॠराशी, ढ.त. हे त्यांचे खेळ बनले आहेत. त्यातच आपण त्यांना बाहेरील अन्नपदार्थांची सवय लावून त्यांच्या आरोग्याचे नुकसान करण्यास जबाबदार ठरतो. आपली मुलं दिवसातून किती व्यायाम करतात, किती तास झोपतात, काय खातात, जेवणाचे वेळापत्रक इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. 

सुरुवातीला आपण सध्या प्रत्येक घरातील मुलांच्या खाण्यात येणारे पदार्थ, त्यामधील घटकद्रव्ये आणि त्याचे फायदे-तोटे पाहू. 

1) बेकरी उत्पादने – यामध्ये बिस्कीट्स, टोस्ट, ब्रेड, रोल, केक, पेस्ट्री, बन, पिझ्झा, बर्गर इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. हे सर्व पदार्थ प्रामुख्याने मैदा, यीस्ट, फॅट यापासून बनलेले असतात. यामध्ये तुलनेने पोषणतत्त्वे कमी असतात; परंतु कॅलरीज जास्त असतात. त्यांच्या जास्त सेवनाने स्थौल्य, अपचन, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार, फॅटी लिव्हर इत्यादी आजार उद्भवू शकतात. 

2) चॉकलेट्स – चॉकलेट्समध्ये प्रामुख्याने कोको झाडाच्या बिया, साखर, फॅट, दूध, कॅफीन, थिओब्रोमीन इत्यादी घटक असतात. या घटकांच्या विविधतेनुसार बाजारांमध्ये ाळश्रज्ञ चॉकलेट्स ऊरीज्ञ चॉकलेट्स र्ीपीुशशींशप (इरघळपस) चॉकलेट्स असे विविध प्रकार आढळतात. यामध्येही खूप जास्त प्रमाणात कॅलरीज आढळतात. यांच्या जास्त सेवनाने स्थौल्य, हृदयरोग, दात किडणे, हाडे झिजणे, अ‍ॅसिडीटी, रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणे, अ‍ॅलर्जी, कॅफीन यामुळे वारंवार खाण्याची सवय लागणे इत्यादी दुष्परिणाम आढळतात.

3) जॅम आणि जेली – फळांचा रस किंवा साका (पल्प) साखर, पेक्टीन, कृत्रीम रंग, प्रिझर्वेटिव्हस् (व्हिनेगर, सायट्रिक अ‍ॅसिड, सोडियम बेंझोएट इत्यादी) फ्लेवरिंग एजेंटस् इत्यादी घटक असतात. 

यांच्या अतिसेवनाने स्थौल्य, दात किडणे, मधुमेह, ट्रायग्लिसराईड वाढणे, अ‍ॅलर्जी, कॅन्सर, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार उद्भवतात. 

अ‍ॅस्परटेम, संकरित यासारख्या ईींळषळलळरश्र डुशशींपशीी तसेच ईींळषळलळरश्र वूशी, ऋश्रर्रीेींळपस रसशपीीं, झीशीर्शीींरींर्ळींशी इत्यादी वापरामुळे पॅकबंद अन्नधान्य हे अ‍ॅलर्जी, कॅन्सर इत्यादी उद्भवण्यास कारणीभूत ठरते. 

4) सॉस – द्रव किंवा अर्धद्रव अवस्थेत वापरले जाणारे आणि टोमॅटो इत्यादी सारख्या पदार्थांपासून बनवलेले हे पदार्थ जरी इतर पदार्थांबरोबर चव वाढवण्यासाठी वापरले जात असले तरी त्यामुळे डोकेदुखी, अ‍ॅलर्जी, खाज, पोटाचे विकार उद्भवू शकतात. 

5) नुडल्स – गहू, तांदूळ, यांचे पीठ, टॅपीओका स्टार्च इत्यादी. बनवलेले वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असणारे नूडल्स सध्या लोकांच्या आहार जास्त प्रमाणात आळतात. तसेच त्याबरोबर येणार्‍या मसाल्यामध्ये वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ आणि मीठ, अजिनोमोटो इत्यादी घटक आढळतात. हे पदार्थ शरीरावर दुष्परिणाम करणारे आहेत. 

6) कुरकुरे, पोटॅटो चिप्स इत्यादी – यामध्ये तांदूळ, पीठ, बटाटा, पामतेल, मका धान्ये, मीठ, मसाले इत्यादी पदार्थ असतात. 

यामुळे पचन संस्थेचे विकार, अ‍ॅलर्जी, स्थौल्य इत्यादी उद्भवण्यास मदत होते. 

7) शीतपेये, आइस्क्रीम, फ्रुटी इत्यादी – यामध्ये कोको फळांचे ज्युस, साखर Preservatives (sodium benzoate, pottassium meta bisulphate इत्यादी घटक द्रव्ये असतात. यामुळे पचनसंस्थेचे विकार, स्थौल्य, त्वचाविकार, डोकेदुखी इत्यादी उद्भवतात.  वरील पदार्थांचे दुष्परिणाम पाहिल्यानंतर मुलांना देता येतील असे आहारीय पदार्थ पाहूया. 

1) घरगुती पदार्थ : घरामध्ये बनवलेले चपाती, भाकरी, वेगवेगळ्या भाज्या, दूध, तूप, सॅलड, पदार्थ, पोषणद्रव्ये पुरवितात.

2) फळे : यामध्ये चिकू, कलिंगड, खरबूज, पेरू, सफरचंद, केळी, द्राक्षे, सिताफळ, पायनापल, अंजीर, गाजर, बीट, खजूर, इत्यादी ओली फळे तसेच मनुका, काजु अक्रोड, खारीक, बदाम इत्यादी सुकी फळे देऊ शकतो. या फळांमधून सर्व पोषणद्रव्ये मिळून शारीरिक आणि मानसिक वाढीस मदत होते.

3)  sprouts – यामध्ये मूग, मटकी, हुलगे, 

हरभरा, चवळी इत्यादी कडधान्ये भिजवून त्याला मोड आल्यावर त्याचा वापर केला जाऊ शकतो. कुपोषण protein energy malnutrition 

टाळण्यास मदत होते. 

4) पौष्टिक लाडू : यामध्ये राजगीरा लाडू, गुळ+शेंगगाणा, लाडू अशा वेगवेगळ्या प्रकाराने बनवून देऊ शकतो. उदाहरणादाखल म्हणून थंडीमध्ये द्यावयाच्या पौष्टिक लाडूंमधील घटकद्रव्ये पाहू. 

1) खारीक – 250 ग्रॅम 

2) खडीसाखर – 250 ग्रॅम 

3) खोबरे – 250 ग्रॅम 

4) बेदाणे – 250 ग्रॅम 

5) खसखस – 50 ग्रॅम 

5) ऑट्स, शेवई इत्यादी पदार्थ दुधासह दिल्यास पोषणतत्त्वे योग्य प्रमाणात मिळतात. 

6) शिरा, उपमा इत्यादी महाराष्ट्रीयन पदार्थ दिल्याने मुले आवडीने खातात आणि पोषणतत्त्वेही मिळतात. 

7) इडली, डोसा, उतप्पा इत्यादी तांदळापासून बनवलेले पदार्थ आणि गाजर, मुळा, काकडी, बीट या सॅलड पदार्थांनी आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. 

8) दूध आणि दुग्धजन्य पदार्थ (तूप, लोणी, ताक, दही इत्यादी) यांचा वापर आहारात केल्याने पोषणद्रव्ये योग्य प्रमाणात मिळतात. 

Back to top button