ज्ञानात भर : सहस्र अब्ज डॉलर्सची कंपनी  | पुढारी

ज्ञानात भर : सहस्र अब्ज डॉलर्सची कंपनी 

एक हजार अब्ज डॉलर्स भागभांडवल असलेली जगातील पहिली खासगी क्षेत्रातील कंपनी बनण्याचा मान ‘अ‍ॅपल इनकॉर्पोरेशन’ या कंपनीने मिळवला आहे. 1976 साली कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथे एका छोट्या गॅरेजमध्ये या कंपनीची स्थापना झाली. स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझनिक व रोनाल्ड वायने हे तिघे जण या कंपनीचे संस्थापक आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ही कंपनी प्रसिद्ध आहे, तिच्या उच्च दर्जाच्या ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी – उदा. आयफोन स्मार्ट फोन्स, आयपॅड, टॅब्लेट कॉम्प्युटर, मॅक पर्सनल कॉम्प्युटर, आयपॉड पोर्टेबल मीडिया प्लेअर, अ‍ॅपल वॉच व अ‍ॅपल टीव्ही. यासोबतच कंपनी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व ऑनलाईन सेवा पुरविते. 1 हजार अब्ज डॉलर्स भागभांडवलाचा टप्पा पार केल्याने अ‍ॅपल जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

Back to top button