वाटचाल तंत्रस्नेही शिक्षणाची | पुढारी

वाटचाल तंत्रस्नेही शिक्षणाची

रणजितसिंह डिसले
ग्लोबल टीचर

आजमितीला महाराष्ट्रातील तब्बल 60 लाख मुले क्यूआर कोडेड पुस्तके वापरत आहेत. पुस्तकातील आशय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बोलका करणारा हा अभिनव उपक्रम जगातील 300 नवोपक्रमांमध्ये निवडला गेला. शाळा-समाज-शिक्षक या त्रिसूत्रीच्या मदतीने मुलांच्या विकासाकरिता अधिक प्रभावी प्रयत्न करता येतात. भारतातील एका छोट्याशा गावातील प्रयोग इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असे वाटले नव्हते.

ऑनलाईन शिक्षण, अ‍ॅप बेस्ड लर्निंग, मोबाईल लर्निंग हे आजच्या घडीला परवलीचे शब्द झाले आहेत. तंत्रज्ञानाने चार भिंतींची वर्गखोली आता विश्वव्यापी केली आहे. नव्वदीच्या दशकात आपल्या देशात संगणक युग आले आणि शिक्षणात त्यातही प्राथमिक शिक्षणात त्याच्या वापराविषयी चर्चा सुरू झाल्या. 2009 साली मी परितेवाडी या खेडेगावातील शाळेत रुजू झालो. गावात राहणार्‍या मुलांना शिक्षणाचा एकमेव पर्याय म्हणजे माझी शाळा. कारण, दुसर्‍या गावातील शाळा तब्बल तीन किलोमीटर दूर. रोज एवढे अंतर पार करणे चिमुकल्या मुलांना अशक्य. शाळेत शिकणार्‍या मुलांचे पालक शेतकरी. ते गावात न राहता शेतात राहायचे. शाळेत करायच्या तंत्रस्नेही बदलांविषयी माझ्या मनात खूप संकल्पना होत्या. पहिल्या दिवशी शाळा पाहिली आणि मी जमिनीवर आलो.

माझ्या समोरची आव्हाने फार खडतर होती. दोन खोल्यांची शाळा केवळ एकाच खोलीत भरत होती. दुसरी खोली जनावरांचा गोठा म्हणून वापरली जात होती. विशेष म्हणजे, एकाच खोलीत 1 ली ते 4 थीच्या वर्गाची मुले शिकत होती. आपल्या मुलांनी शाळेत जाण्याऐवजी शेतात जावे, असे पालकांना वाटे. त्यामुळे शाळेत येणार्‍या मुलांची संख्यादेखील फार कमी होती. पिण्याचे पाणी, वीज या सुविधादेखील नव्हत्या. ही प्रतिकूल परिस्थितीच माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली. सर्वप्रथम गावाची शैक्षणिक स्थिती जाणून घेण्यासाठी एक व्यापक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणांतून प्राप्त माहितीच्या आधारे उपाययोजनांचा क्रम ठरवला. शाळेतील बदल प्रक्रियेचा एक पंचवार्षिक आराखडाच मी बनवला. या आराखड्यात तीन आव्हाने प्रामुख्याने मांडली होती. 1) मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल पालकांची उदासीनता, 2) गुणवत्तापूर्ण शिक्षण अभाव, 3)शिक्षकांमध्ये व्यावसायिक वृत्तीचा अभाव.

या आव्हानांवर मात करून पुढील पाच वर्षांच्या कृतींचा व्यापक आराखडा बनवला. मुलांच्या शिक्षणाबाबत पालकांमध्ये जाणीव निर्माण करणे हे सर्वात महत्त्वाचे आव्हान माझ्या समोर होते. शाळेत गैरहजर असणार्‍या प्रत्येक मुलाच्या घरी जाऊन, शेतात जाऊन त्याला रोज शाळेत घेऊनच यायचे, असे मी ठरवले. दररोज शाळा सुरू झाल्यावर हजेरी घेऊन मी लगेच गैरहजर मुलांच्या घरी व शेतात जायला सुरुवात केली. सुरुवातीला तर दुपारपर्यंत मी असाच भटकत असे. शाळेतील निम्मा वेळ मुलांना शाळेत आणण्यासाठीच खर्च होत होता. मात्र, याचा चांगला परिणाम असा झाला की, घरी किंवा शेतात गेलो तरी हे गुरुजी शाळेत न्यायला येतातच, अशी पालकांची ठाम धारणा झाली. परिणामी, त्यांनी घरातील सगळीच मुले शाळेत पाठवायला सुरुवात केली.

हेतू सफल होताना दिसू लागताच मी शाळेची दुसरी वर्गखोली परत मिळवण्याच्या प्रयत्नाला लागलो. गावातील एका शेतकर्‍यानेच ती खोली काबीज करून तिचे गोठ्यात रूपांतर केले होते. गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच यांच्या मदतीने ती वर्गखोली परत मिळवली. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी पालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मी गावातील अनेक सण-समारंभ याला जाणीवपूर्वक हजेरी लावू लागलो. लोकांमध्ये मिसळून त्यांचे विचार जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न होता. शाळेमध्ये करत असलेल्या बदलांना पालकांचादेखील पाठिंबा असायला हवा, याकरिता मी आग्रही राहिलो. कारण, शाळा-समाज-शिक्षक या त्रिसूत्रीच्या मदतीने मुलांच्या विकासाकरिता अधिक प्रभावी प्रयत्न करता येतात, असे मला वाटते.

शाळेप्रति मुलांचे वाढते आकर्षण पाहून मी शाळेत लॅपटॉप आणायचे ठरवले. यामागे दोन महत्त्वाची कारणे होती. एक म्हणजे, शाळेत विजेची सुविधा नसल्यामुळे संगणक घेऊनही काही उपयोग नव्हता आणि दुसरे म्हणजे लॅपटॉपच्या मदतीने संगणक शिक्षण देऊन अर्थार्जन करण्याचा एक मार्ग मुलांना खुला करून देणे.

शिक्षण घेऊनही नोकरी मिळाली नाही की, शिक्षणावर खर्च केलेला पैसा वाया गेला, असा पालकांचा समज होता. हा समज दूर करण्यासाठीच लॅपटॉपच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण देण्याचा निर्णय मी घेतला. लॅपटॉप विकत घेण्याइतपत पैसे माझ्याकडे नव्हते. त्यामुळे मी माझ्या वडिलांनी दिलेल्या पैशांतून लॅपटॉप विकत घेतला. या लॅपटॉपचे मुलांना भारीच कौतुक. पहिले तीन महिने आम्ही केवळ चित्रपट आणि गाणीच पाहत होतो. शाळेत खूप मज्जा करायला मिळते.

काही तरी नवीन पाहायला मिळते, ही भावना मुलांमध्ये वाढीस लागली. शाळा हे आनंददायी ठिकाण असायला हवे. शिकण्याची प्रक्रिया ही हसत-खेळतच व्हायला हवी. मुलांना स्वतःच्या गतीने जेव्हा हवं, जे हवं ते करायला मी परवानगी देतो. त्यामुळे माझ्या वर्गातील मुले एका विशिष्ट ठिकाणी बसलेली आढळणार नाहीत. लॅपटॉपच्या मदतीने शिक्षण देताना मी त्यांना संगणक हाताळण्याचे औपचारिक शिक्षणदेखील देत राहिलो. त्यामुळे भविष्यात संगणकाधारित दैनंदिन कामे पार पाडण्यास त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक अशी कौशल्ये विकसित करण्यावर माझा भर राहिला. 21 व्या शतकातील शिक्षण कौशल्ये जाणीवपूर्वक विकसित करण्यास प्राधान्य दिले. यामध्ये संवाद कौशल्य, क्रिटिकल थिंकिंग, माहितीचा पडताळा घेणे, सर्जनशीलता यांचा समवेश होता. पाठ्यपुस्तकातील अनेकविध घटक, अमूर्त संबोध संगणकाच्या मदतीने अधिक प्रभावीपणे समजून घेता येत असल्याने मी स्वतःच मातृभाषेत व्हिडीओ व पीपीटी बनवायला सुरुवात केली.

मुलांना समजतील अशा भाषेत व्हिडीओ असल्याने त्यांना ते आवडू लागले. यूट्यूबवरील अनेक व्हिडीओ त्यांच्या निर्मात्यांची परवानगी घेऊन भाषांतरित करायला सुरुवात केली. बघता बघता चार वर्षांत तब्बल 140 जीबी इतकी मोठी डिजिटल रिसोर्स बँक माझ्याकडे तयार झाली. प्रत्येक घटकावर आधारित असे व्हिडीओ, पीपीटी अन् प्रश्नपत्रिका असा संच तयार झाला होता. अर्थात, ही डिजिटल रिसोर्स बँक प्रभावीपणे वापरता येण्याचे कौशल्य विकसित करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे होते आणि याकरिता पालकांची मदत घेण्याचे मी ठरवले.

पालकांनी साथ दिली; तर उपायांची परिणामकारकता अधिक वाढेल, असे मला वाटत होते. याकरिता मी एक भन्नाट उपक्रम सुरू केला. ‘अलार्म ऑन टी.व्ही. ऑफ’ (रश्ररीा जप ढत जषष) हे त्याचे नाव.आपल्या पाल्याकरिता रोजचा एक तास वेळ देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले. याकरिता शाळेच्या इमारतीवर एक भोंगा (रश्ररीा) बसवण्यात आला. रोज सायंकाळी सात वाजता तो भोंगा वाजवला जातो. हा भोंगा वाजला की, घरातील टी.व्ही., इतर कामे बाजूला ठेवून पुढचा एक तास मुलांसोबत अभ्यासविषयक कृतीमध्ये सहभागी व्हायचे. आता या एका तासात पालकांनी कोणत्या कृती करायच्या याचा डचड त्यांना रोज दुपारी दोन वाजता पाठवला जातो.

त्यामुळे पालकांना दुपारीच समजते की, आज रात्री काय करावं लागणार आहे अन् त्यानुसार ते त्यांच्या इतर कामांचे नियोजन करू लागले. याचा एक फायदा असा झाला की, शिक्षण प्रक्रियेत पालकांचा सहभाग वाढला अन् त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली. अभ्यास करताना मुलांना काही अडचणी जाणवल्या, तर त्या लगेच सोडवल्या जाऊ लागल्या. तसेच पालक अभ्यास घेतात म्हटल्यावर मुलेही अधिक जबाबदारीने अभ्यास करू लागली. गेली नऊ वर्षे हा उपक्रम सुरू आहे. हा उपक्रम म्हणजे एक चळवळ झाली आहे. मोबाईलवर एसएमएस पाठवण्याचा साधा प्रयोग; पण तो खूप प्रभावी ठरला. मोबाईल बेस्ड तंत्रज्ञान शैक्षणिक हेतूने वापरता येऊ शकते याची जाणीव त्यांना होऊ लागली.

हे सारे तंत्रस्नेही प्रयोग सुरू असताना मी तयार केलेली डिजिटल रिसोर्स बँक कधीही, कुठेही वापरता यावी, यासाठी मी प्रयत्नशील होतो. शाळेत वीज उपलब्ध नसायची. त्यामुळे मुलांना घरबसल्या स्वतःच्या गतीने शिकता येईल का? या विचारात असताना मला पुस्तकात टठ कोड वापरण्याची कल्पना सुचली. माझ्याकडे पाठाकरिता व्हिडीओ, कवितांचे ऑडिओ फॉरमॅट आदी डिजिटल रिसोर्स उपलब्धच होते. मी मुलांच्या पुस्तकात प्रत्येक पाठाकरिता एक टठ कोड चिकटवायचा निर्णय घेतला. या कोडमध्ये त्या-त्या धड्याशी संबंधित असा व्हिडीओ, ऑडिओ व प्रश्नपत्रिका यांची लिंक दिलेली आहे. पालकांच्या मोबाईलच्या सहाय्याने हा कोड स्कॅन करायचा अन् त्या धड्याशी संबंधित असे सारे डिजिटल रिसोर्स पाहायचे, अशी यंत्रणा त्यात होती.

याची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची अडचण म्हणजे पालकांकडे असे स्मार्टफोन असायला हवेत अन् इंटरनेट सुविधा असायला हवी. सन 2014 साली केवळ आठ पालकांकडे असे स्मार्टफोन होते. या पालकांना सोबत घेऊन याची चाचणी करायचे ठरवले. या पालकांच्या मुलांच्या पुस्तकात एकूण 29 टठ कोड चिटकवले अन् हे कोड कसे वापरायचे, यासाठी पालकांचे दोन तासांचे प्रशिक्षण आयोजित केले. या दोन तासांत टठ कोड स्कॅन करून डिजिटल रिसोर्स कसा रललशीी करायचा हे त्यांना शिकवले. मुलेदेखील या प्रशिक्षण वर्गात उपस्थित होती.

काही अडचण आलीच, तर मार्गदर्शक असे व्हिडीओ ट्युटोरिअल बनवले होते, पालकांच्या मोबाईलमध्ये हे ट्युटोरिअल सेव्ह करून दिले. त्यामुळे आपण कुठे चुकलोय, त्यावर उपाय काय, हे त्यांना लगेच समजू लागले. जून 2014 साली इयत्ता 1 लीच्या आठ मुलांवर हा प्रयोग केला. पुस्तकावर मोबाईल धरला की, कविता ऐकायला मिळते, धड्याचा व्हिडीओ पाहता येतोय याचे मुलांना भारी कौतुक. टठ कोडची आयडिया अपेक्षेपेक्षा जास्त लोकप्रिय ठरली. सहकारी पालकांकडे मोबाईल आहे हे पाहून इतर पालकांनीदेखील असे स्मार्टफोन आणायला सुरुवात केली. वर्ष संपेपर्यंत पहिलीच्या वर्गातील 19 पालकांकडे असे फोन होते. मुलांच्या शिक्षणावर गुंतवणूक केली पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात रुजवण्यात थोडे यश मिळाले होते. मुलांनी आनंदाने शिकलं पाहिजे, हा हेतू काही प्रमाणात साध्य होत होता. आमच्या शाळेतील ही टठ कोडची आयडिया शेजारच्या शाळेतदेखील पोहोचली. त्या शाळेतील पालकदेखील असे कोड घेण्यासाठी माझ्या शाळेत येऊ लागले. हळूहळू ही संकल्पना पालकांना व मुलांना आवडू लागली होती.

सन 2015 साली माढा तालुक्यातील 297 शाळांमध्ये अशी टठ कोडेड पुस्तके वापरायला सुरुवात केली गेली. याची उपयुक्तता पाहून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वच पुस्तकांमध्ये टठ कोड वापरायला सुरुवात केली. आजमितीला महाराष्ट्रातील तब्बल 60 लाख मुले अशी टठ कोडेड पुस्तके वापरत आहेत. पुस्तकातील आशय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बोलका करणारा हा अभिनव उपक्रम जगातील 300 नवोपक्रमांमध्ये निवडला गेला. मायक्रोसॉफ्टकडून या नावीन्यपूर्ण उपक्रमाकरिता चळलीेीेषीं खपर्पेींरींर्ळींश एर्वीलरीेीं एुशिीीं हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आजमितीला भारत सोडून 11 देशांतील 25 शाळांमध्ये अशी टठ कोडेड पुस्तके वापरली जात आहेत. महाराष्ट्र शासन व मायक्रोसॉफ्ट यांच्या सहकार्यामुळे हा प्रयोग जगभरात पोहोचला. कॅनडात मार्च 2017 साली झालेल्या जागतिक शिक्षण परिषदेत हा प्रकल्प राबवण्याबाबत 11 देशांतील शाळांसोबत सामंजस्य करार करण्यात आला. भारतातील एका छोट्याशा गावातील हा प्रयोग इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असे वाटले नव्हते. मोबाईल हे किती प्रभावी शैक्षणिक साधन आहे, याची प्रचिती यानिमित्ताने सर्वांना आली.

संगणक किंवा मोबाईल अशा अनेकविध तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती मिळवण्याचे कौशल्य मुलांनी काळाच्या ओघात प्राप्त केले. जगाच्या स्पर्धेत टिकायचं असेल, तर इंग्रजी भाषा आत्मसात केली पाहिजे. खेड्यातील मुलांना इंग्रजी म्हणजे भीतीदायक विषय. मुलांना अस्सखलितपणे इंग्रजी बोलता, लिहिता आली पाहिजे. शाळेच्या, गावाच्या बाहेरील जग पाहिले पाहिजे, नवनवीन अनुभव घेतले पाहिजेत, असे मला नेहमीच वाटते. कारण, अनुभवातून घेतलेले शिक्षण अधिक प्रभावी ठरते, असे मला वाटते. शाळेच्या भिंतींबाहेरील जग अनुभवण्यासाठी डज्ञूशि ळप लश्ररीीीेेा हा प्रोग्राम सुरू करण्याचा निर्णय मी घेतला. गावकर्‍यांच्या सहकार्यातून शाळेत संगणक मिळाला होता. मी स्वतः एक प्रोजेक्टर विकत घेतला. ग्रामपंचायतीने सोलर सिस्टीम उपलब्ध करून दिली होतीच.

त्यामुळे भौतिक सुविधांचा प्रॉब्लेम आता सुटला होता. आता अधिक वेगाने पावले टाकण्यास मी सुरुवात केली. माझ्या शाळेतील मुले पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील जग अनुभवत स्वतःच्या गतीने शिकू शकतात का? स्वतःच्या भाषेत स्वतःचे मत मांडू शकतात का? अनोळखी व्यक्तींशी संवाद साधत त्यांच्याकडून अपेक्षित माहिती प्राप्त करू शकतात का? या सार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच डज्ञूशि ळप लश्ररीीीेेा ची रचना केली. सुरुवातीला शेजारच्या गावातील शाळांशी संवाद साधत आम्ही एकेक पाऊल टाकायला सुरुवात केली. 10-10 मिनिटांची संवादरूपी सत्रे सुरुवातीला घेत असू. यातून प्रसंगोत्पात संवाद कौशल्य विकसित करण्याकडे माझा कल होता. मुलांच्या मनातील भीती दूर होऊन मुले मुक्तपणे संवाद साधण्यास सज्ज झाली पाहिजेत, याकडे माझे लक्ष होते.

आता आम्ही डज्ञूशि च्या मदतीने पाठ्यपुस्तकातील घटक अधिक प्रभावीपणे समजून घेण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. एखादा शिक्षक एखादा विषय खूप चांगल्या पद्धतीने शिकवत असतो. एखाद्या शिक्षकाचा आवाज खूप चांगला असेल, तर तो कविता खूप चांगल्या पद्धतीने शिकवत असतो. मी अशा प्रभुत्वप्राप्त शिक्षकांचा शोध घ्यायला सुरुवात केली. जेणेकरून माझ्या शाळेतील मुलांना एुशिीीं ढशरलहशी कडून शिकण्याची संधी मिळेल. मागील दोन वर्षांत आम्ही जगातील 87 देशांतील 152 शाळांमधील शिक्षकांशी संवाद साधत अनेकविध घटक समजून घेतले आहेत. तंत्रस्नेही अनुभव मुलांना द्यायला हवेत. त्यातूनच मुले अधिक समृद्ध होत जातील. आमच्या तंत्रस्नेही अध्यापन पद्धतीची दखल मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नाडेला यांनी घेतली. त्यांनी लिहिलेल्या कळीं ठशषीशीह या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान दिल्ली येथे 7 नोव्हेंबर 2017 रोजी त्यांनी भारतातील तीन ठशषीशीहळपस डीेींळशी जगासमोर आणल्या. या तीन व्यक्तींमध्ये माझा समावेश होता.

मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून माझ्या शाळेतील तंत्रस्नेही प्रयोगांची दखल संयुक्त राष्ट्राने घेत त्याच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे (र्डीीींरळपरलश्रश ऊर्शींशश्रेिाशपीं ॠेरश्री) या मोहिमेमध्ये मला सहभागी करून घेतले. यामधील उद्दिष्ट क्रमांक 4 (र्टीरश्रळीूं एर्वीलरींळेप) च्या पूर्ततेसाठी म्हणून मी सप्टेंबर 2017 पासून व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप हा जगभरातील मुलांकरिता जागतिक प्रयोग सुरू केला आहे. एक शिक्षक म्हणून जगभरातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी व विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने भावी शास्त्रज्ञ घडवण्यासाठी याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या व्हर्च्युअल फिल्ड ट्रिपच्या मदतीने जगभरातील मुलांना पाठ्यपुस्तकावर आधारित वेगवेगळे प्रयोग डज्ञूशि च्या मदतीने करून दाखवले जात आहेत. ज्या शाळांमध्ये सुसज्ज अशी प्रयोगशाळा नाही अशा शाळांतील मुलांना अनेकविध वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यासाठी व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप ऑफ सायन्स पार्क अतिशय उपयुक्त ठरत आहेत. मागील 5 महिन्यांत जगातील 42 देशांतील 253 शाळांमधील 9,034 मुलांनी याचा लाभ घेतला आहे. पुढील वर्षभरात जवळपास 1 लाख मुलांनी याचा लाभ घ्यावा, असे नियोजन आहे. अशाप्रकारे शिक्षण देणारा भारत हा जगातील आठवा देश ठरला आहे.

सन 2009 साली मी माझ्या शिक्षण क्षेत्रातील सेवेला प्रारंभ केला. मागील 11 वर्षांत मी 157 देशांतील 1,200 शाळांमधील 72,000 हून अधिक मुलांना वेगवेगळे अध्ययन अनुभव दिले आहेत. माझ्या मते येणार्‍या भविष्यात शिक्षक व विद्यार्थी या दोघांकडे निवड स्वातंत्र्य असेल. आपल्या आवडीचे शिक्षक निवडून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्याकडून नवनवीन माहिती, वेगवेगळे अध्ययन, अनुभव प्राप्त करत अनुभवविश्व अधिक संपन्न करण्याचे स्वातंत्र्य मुलांना असेल. त्याचवेळी एकाच वर्गखोलीतील मुलांसोबतच जगातील कोणत्याही देशातील मुलांना शिकवण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांकडे असेल. पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम यासारख्या प्रचलित संसाधनांसोबतच 21 व्या शतकातील कौशल्य विकासाला अधिक महत्त्व प्राप्त होऊ शकेल, अशी कौशल्ये अगोदर शिक्षकांनी आत्मसात करावी म्हणजेच ती विद्यार्थ्यांमध्ये प्रतिबिंबित होतील.

Back to top button