Hero Motocorp Electric Bike : हिरो लवकरच करणार इलेक्ट्रीक बाईक लॉन्च | पुढारी

Hero Motocorp Electric Bike : हिरो लवकरच करणार इलेक्ट्रीक बाईक लॉन्च

पुढारी ऑनलाईन डेस्क

Hero Motocorp Electric Bike : भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ अतिशय वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस नवीन आणि जुन्या कंपन्या एकामागून एक इलेक्ट्रिक कार तसेच इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्समध्ये (Electric Scooter And Bike) नवनवीन उत्पादने निर्माण करत आहेत.

 लवकरच भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी असलेल्या (Largest Two Wheeler Company Hero Motocorp) देखील लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. (Hero Motocorp Electric Scooter)

Hero Motocorp Electric Bike : हिरो इलेक्ट्रीक बाईक लवकरच येणार

 पेट्रोलवर हिरो मोटोकॉर्पची वाहने आहेतच. आता आगामी काळात आगामी काळात हिरो मोटोकॉर्पच्या (Hero MotoCorp) इलेक्ट्रिक बाईकही (electric vehical) रस्त्यावर धावणार असल्याचे हिरो कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

यापूर्वी हिरो इलेक्ट्रीक व्हेईकल नावाने हिरो आपल्या वाहनांची विक्री करत होते. दरम्यान आता हिरो विडा नावाने आपला नवीन ब्रँड बाजारात आणणार आहे.रशलेन कंपनीच्या अहवालानुसार Hero Moto Corp ने अलीकडे VIDA ब्रँड नावाखाली सर्व नवीन नावाची नोंदणी केली आहे, VIDA Electric, VIDA EV, VIDA Mobility, VIDA Moto Corp, VIDA Scooters आणि VIDA Motorcycles अशी नावे आहेत.

Hero MotoCorp आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर किंवा मोटरसायकल Vida Electric या ब्रँड नावाने बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.Hero MotoCorp आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील त्यांच्या उत्पादन प्रकल्पात सर्व इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी Hero MotoCorp च्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरची झलक समोर आली होती.

दरम्यान हिरोकडून यावर्षी तैवान कंपनी गोगोरोशी करार केला आहे. या दोन्ही कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॅटरी तंत्रज्ञान बदलू शकतात. याचबरोबर आगामी काळात होंडा आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर देखील भारतात लॉन्च करणार आहे.

हेही वाचलं का?

Back to top button