Ganesh Utsav 2023 : श्री साईबाबांची आरती | पुढारी

Ganesh Utsav 2023 : श्री साईबाबांची आरती

Ganesh Utsav 2023 : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर श्री गणेशाच्या स्थापनेने गणेश उत्सवचा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेशाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापना करण्यात आली.  श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या स्थापनेने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. गणरायांच्या आगमनाने नवीन आशा, नवी उमेद, प्रसन्नता निर्माण झाली आहे. सर्वत्र गणेश उत्सवचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. विघ्नहर्ता बाप्पा सर्वांच्या आयुष्यातील विघ्न दूर करो, हीच प्रार्थना आहे. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. गणपतीच्या आरतीसह श्री साईबाबांची आरती ही गणेश चतुर्थी उत्‍सव काळात म्‍हटली जाते.

श्री साईबाबांची आरती

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजतळीं । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।।ध्रु ।।

जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहे दंग ।
मुमुक्षू जनां दावी । निज डोळा श्रीरंग ।। १ ।।

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजतळीं । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।।ध्रु ।।

जया मनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव ।। २ ।।

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजतळीं । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।।ध्रु ।।

तुमचे नाम ध्याता । हरे संस्कृतीव्यथा ।
अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ।। ३ ।।

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजतळीं । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।।ध्रु ।।

कलियुगी अवतार । सगुण परब्रह्मः साचार ।
अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ।। ४ ।।

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजतळीं । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।।ध्रु ।।

आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ।। ५ ।।

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजतळीं । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।।ध्रु ।।

माझा निज द्रव्य ठेवा । तव चरण रजसेवा ।
मागणे हेंचि आता । तुम्हा देवाधिदेवा ।। ६ ।।

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजतळीं । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।।ध्रु ।।

इच्छित दिन चातक । निर्मल तोय निजसुख ।
पाजावे माधवा या । सांभाळ आपुली भाक ।। ७ ।।

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजतळीं । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।।ध्रु ।।

हेही वाचलंत का? 

Back to top button