Ganesh Utsav 2023 : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर श्री गणेशाच्या स्थापनेने गणेश उत्सवचा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेशाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापना करण्यात आली. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या स्थापनेने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. गणरायांच्या आगमनाने नवीन आशा, नवी उमेद, प्रसन्नता निर्माण झाली आहे. सर्वत्र गणेश उत्सवचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. विघ्नहर्ता बाप्पा सर्वांच्या आयुष्यातील विघ्न दूर करो, हीच प्रार्थना आहे. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. तसेच गणपतीच्या वेगवेगळ्या आरतींमध्ये नाना परिमळ ही आरती सुद्धा गणेश चतुर्थी उत्सव काळातील पुजेत म्हटली जाते.
आरती श्री गणपतीची (नाना परिमळ)
नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमिपत्रे ।
लाडू मोदक अन्न परिपूरिते पात्रें ।।
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टही सिध्दि नवनिधी देसी क्षणमात्रे ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फुर्ती ।।धृ।।
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलही पापे विघ्नेही हरती ।।
वाजी वरण शिबिका सेवक युवती ।
सर्वही पावुनी अंति भवसार तरती ।। २ ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फुर्ती ।।धृ।।
शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी ।
कीर्ति तयांची राही जोंवरि शशीतरणी।।
त्रैलोयी ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसवीनंदन रत नामस्मरणी ।। ३ ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फुर्ती ।।धृ।।
हेही वाचलंत का?