आजचे राशिभविष्य (दि. २ सप्टेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २ सप्टेंबर २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष ः जबाबदार्‍या पूर्ण केल्याचा आनंद व समाधान मिळेल. नातेवाईक मित्रपरिवार यांना आपल्या मदतीची गरज भासेल, ती आपण पूर्ण करणार आहात.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः कामांमध्ये आनंद वाटेल. नोकरीत पदोन्‍नतीची संधी मिळेल. महत्त्वाच्या कामांमध्ये मित्रांची मदत मिळेल. वरिष्ठांची मर्जी राखाल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः व्यवहारी द‍ृष्टिकोनातून कामे करणे चांगले ठरेल. आर्थिक फायदा होणार आहे. वस्त्र खरेदी कराल. मेजवानीचा लाभ घ्याल.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः व्यवहार करताना दक्ष राहा. आर्थिक देवाण-घेवाण नीट करा. फसवणूक होऊ नये याची काळजी घ्या, सार्वजनिक कामात रंगाचा बेरंग होऊ शकतो.
राशिभविष्य
सिंह
सिंह ः आजूबाजूचे वातावरण चांगल्या प्रभेखाली भारलेले असेल. विचाराधीन कार्ये पूर्ण होताना बघून, उत्साही राहाल. व्यापार-व्यवसायात फायद्याचे प्रमाण वाढेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः सरकारी अधिकारी संरक्षण दलातील कर्मचारी इत्यादींना मानसन्मानाचे योग. प्रगती होईल. नवीन संधीचा फायदा घ्या. व्यापारात गती घ्याल.
राशिभविष्य
तुळ
तूळ ः कार्यक्षेत्रात काही कारणांसाठी ओळखीचा वापर कराल. नवीन योजना कार्यान्वित करा. आत्मविश्‍वास चांगला राहील. हातातील कामात यश येईल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्‍चिक ः नुकसानभरपाई मिळेल. अध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल. अति आत्मविश्‍वास टाळा. वर्तणुकीने बोलण्याने इतरांना दुखवून कायमचे शत्रू तयार करू नका.
राशिभविष्य
धनु
धनु ः नोकरी करणार्‍यांना दिवस चांगला. कामाचा ताण कमी असेल. व्यवसायिकांना लाभाचे प्रमाण वाढेल. भागीदारीच्या व्यवसायात सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
मकर
मकर ः व्यापार व्यावसायिकांनी हाताखालील व्यक्‍तींकडे चांगले लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कामचुकारपणा किंवा आर्थिक हानी होते की नाही हे लक्ष ठेवा.
कुंभ -
कुंभ
कुंभ ः ग्रहांची अनुकूलता लाभेल. सर्व प्रकारच्या बाबींनी लाभान्वित व्हाल. आपल्या क्षेत्रातली कार्य अल्प प्रयत्नांनी पूर्णत्वास जातील. तरुणांचे प्रश्‍न सुटतील.
राशिभविष्य
मीन
मीन ः प्रलंबित असलेली कामे पूर्ण करून घ्या. जमिनीविषयक व्यवहारांत गती मिळून व्यवहार पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button