Gmail लवकरच येणार नव्या लूकमध्ये, एका टॅबवर चॅट,मीट आणि स्पेस उपलब्ध होणार | पुढारी

Gmail लवकरच येणार नव्या लूकमध्ये, एका टॅबवर चॅट,मीट आणि स्पेस उपलब्ध होणार

पुढारी ऑनलाईन: आजच्या घडीला जगात जवळपास आपण सर्वजण जीमेलचा वापरत करतो. जीमेल आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. जीमेलही बदलत्या काळानुसार कात टाकत आहे. अशातच आता गुगलने जीमेल वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. लवकरच आपल्याला जीमेलचे स्वरूप बदललेले दिसेल. गुगलने नुकतीच घोषणा केली आहे, की ते जीमेलचे नवीन डिझाइन आणणार आहेत. नवीन डिझाइन कंपनीच्या गुगल वर्कस्पेसच्या नवीन प्लॅन अंतर्गत आहे, ज्यामध्ये जीमेल चॅट, गुगल मीट आणि गुगल स्पेसला एकाच विंडोमध्ये आणले जाईल. म्हणजेच गुगलच्या बाकीच्या सेवा जीमेलवरूनच वापरता येणार आहे. यासाठी वेगळे अॅप उघडण्याची गरज नाही.

Sanjay Raut : झुकेंगा नहीं म्हणत संजय राऊत यांचे ट्विट, ममता दीदींचाही केला उल्लेख

8 फेब्रुवारीपासून जीमेलमध्ये बदल

गुगलच्या वर्कप्लेस ब्लॉग पोस्टनुसार, वर्कस्पेस वापरकर्ते 8 फेब्रुवारीपासून जीमेलच्या नवीन इंटीग्रेटेड व्ह्यूची टेस्टिंग करू शकतात.जीमेलच्या नवीन लेआउटमध्ये, वापरकर्त्यांना चार बटण पर्याय दिले जातील, ज्यामुळे वापरकर्ता जीमेलवरून मेल,चॅट, स्पेस आणि गुगल मीटवर शिफ्ट करू शकेल. याचा अर्थ जीमेल, चॅट आणि गुगल मीटसाठी एकच एकत्रित लेआउट असेल.गुगल 2022 च्या यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत जीमेलमध्ये इंटिग्रेटेड व्ह्यू हे फिचर आणणार आहे. जूनपूर्वी जीमेल वापरकर्त्यांना जीमेलचा नवीन यूजर इंटरफेस मिळेल.

IPL Auction : जाणून घ्या कोणत्या संघाने कोणाला केले रिटेन? लिलावासाठी कोणाकडे जास्त पैसे शिल्लक?

गुगलच्या मते, वापरकर्त्यांनी नवीन लेआउट अपडेट केल्यावर विद्यमान मेल आणि लेबल पर्यायांची समान लिस्ट पाहू शकतील. वर्कस्पेस टूलमधील बदलांची घोषणा सर्वप्रथम सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आली होती. वापरकर्ते गुगल मीट लिंकशिवाय इतर जीमेल वापरकर्त्यांसोबत समोरासमोर कॉल करू शकतील. जीमेल वापरकर्ते नवीन जीमेल लेआउट अपडेट केले नाही तरी, कंपनी एप्रिलपर्यंत आपोआप नवीन लेआउटवर स्विच करेल. गुगलच्या मते अपडेट केलेले गुगल वर्कस्पेस बिझनेस स्टार्टर, बिझनेस स्टॅंडर्ड, बिझनेस प्लस, एंटरप्राइज प्लस, एजुकेशन फंडामेंटल्स, एजुकेशन प्लस, फ्रंटलाइन आणि नॉन प्रॉफिट ग्राहकांसाठी उपलब्ध आहे

हेही वाचा:

मुंबई महापालिकेचा सन २०२२-२३ चा सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन नाही, ऑफलाईन पद्धतीनेच होणार, राज्य शिक्षण मंडळाची माहिती

 

Back to top button