मुंबई महापालिकेचा सन २०२२-२३ चा सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर | पुढारी

मुंबई महापालिकेचा सन २०२२-२३ चा सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा

मुंबई महानगरपालिकेचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा सुमारे 45 हजार 949 कोटी 21 लाख रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. यावेळी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने शिवसेना प्रेरित अर्थसंकल्प सादर केला असून, विकास कामांसाठी सुमारे 22 हजार 649 कोटी 73 लाख रुपयांची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

2021-22 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2022-23 च्या अर्थसंकल्पाचे आकारमान 17.70 टक्‍क्‍यांनी वाढले आहे.

महापालिका आयुक्तांनी सत्ताधारी पक्षाचे निवडणूक अर्थसंकल्प सादर करताना सुमारे सात हजार कोटींची वाढ करत ४५ हजार ९४९ पूर्णांक २१ कोटींचा असा ८ पूर्णांक ४३ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प राज्याचे पर्यावरणमंत्री यांच्यासाठी आगामी निवडणुकीसाठी वातावरण पूरक बनवताना आदित्योदयाचा संकल्पच मांडत त्यांच्या संकल्पेनतील उपक्रम, योजना आणि विकासकामांसाठी भरीव तरतूद महापालिक आयुक्तांनी केल्याचे पहायला मिळत आहे.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय निवेदनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा नामोल्लेख करत त्यांच्याकडून मिळालेल्या सहका-याबद्दल विशेष धन्यवाद मानले.

हेही वाचा

Back to top button