टेलिग्राम आणि यूट्यूब वापरणे आता होणार अधिक सोपे; जाणून घ्या नवीन फीचर्स

Apps
Apps
Published on
Updated on

पुणे: पुढारी वृत्तसेवा

इन्स्टंट मेसेजिंग अॅप टेलिग्राम आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने नवीन फीचर्स घेऊन येत आहे. टेलिग्राम नवे फीचर्स हे व्हॉट्स अॅपशी मिळते जुळते आहे. तर यूट्यूबने अँड्रॉइड आणि आयओएस मोबाइलसाठी एक नवीन इंटरफेस आणला आहे. चला तर मग टेलिग्रामच्या आणि यूट्यूबच्या नव्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

टेलिग्रामचे नवे फीचर्स

व्हिडिओ स्टिकर्स- आतापर्यंत अॅनिमेटेड स्टिकर्स तयार करण्यासाठी Adobe illustrator सारखे सॉफ्टवेअर वापरावे लागत होते. पण नवीन अपडेट नंतर टेलिग्राममध्ये व्हिडिओपासून स्टिकर्स तयार करण्याची सुविधा मिळणार आहे. यूजर्स कोणत्याही व्हिडिओ एडिटिंग अॅपच्या मदतीने अॅनिमेटेड स्टिकर्स तयार करू शकतील.

इंटरएक्टिव्ह इमोजी– टेलिग्रामच्या नव्या 8.5 अपडेटमध्ये मेसेजिंगसाठी 5 नवे इमोजी देण्यात आले आहेत. यात हार्ट शेपचे इमोजी, आश्चर्य वाटणारा इमोजी आणि टाळ्या वाजवणाऱ्या इमोजींचा समावेश आहे.

अधिक चांगले नेव्हिगेशन– यूजर्सना पूर्वीपेक्षा चांगले नेव्हिगेशन मिळेल. ज्यामुळे यूजर्स न वाचलेल्या मेसेजवर सहजपणे जाऊ शकतील. त्याचबरोबर, यूजर्स कोणत्याही चॅटवर परत जाण्यासाठी बॅक बटण दाबून ठेवू शकतात. याशिवाय, आपण आपल्या इंडेक्समध्ये फॉरवर्ड मेसेज, लाइक्स, यूजरनेम आणि प्रोफाइल सेव्ह करून ठेवू शकता.

"बग"ची समस्या– टेलिग्रामच्या मते, डेव्हलपर्सनी जानेवारीमध्ये अॅपमध्ये असलेल्या सर्व समस्या दूर केल्या आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, टेलीग्रामचे 8.5 व्हर्जन उत्तम दर्जाचे कॉल, भाषांतरे आणि कोणत्याही पेजवर त्वरीत जाण्याची सुविधा देईल.

यूट्यूबमध्ये हा बदल

गुगलच्या मालकीचे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने त्यांच्या अँड्रॉइड आणि आयओएस मोबाइल अॅपच्या फुल स्क्रीन प्लेयरसाठी एक नवीन इंटरफेस सादर केला आहे. ज्यात फुल स्क्रीनवर व्हिडिओ चालू असतानाही लाइक, डिसलाइक, कमेंट आणि शेअरचे पर्याय दिसतील. आत्तापर्यंत फुलस्क्रीन व्हिडिओला लाईक कमेंट करण्यासाठी ती विंडो मिनीमाइज करावी लागत होती. मात्र आता हे सर्व फुल स्क्रीन विंडोवर करता येणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news