पुणे: पुढारी वृत्तसेवा : CIBIL चा पूर्ण अर्थ क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड असा आहे. हा स्कोअर तुम्ही किती कर्ज घेण्यासाठी पात्र आहात हे दाखवतो. हे तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर आधारित असते. तुम्ही गृहकर्जासाठी किंवा इतर कर्जासाठी अर्ज करणार असाल, तर हा स्कोअर महत्वाची भूमिका बजावतो. या CIBIL स्कोअरमध्ये तुम्ही मागील कालावधीत घेतलेल्या इतर कर्जांची किंवा क्रेडिटची परतफेड कशी केली आहे, याचा समावेश असतो. यावरून तुम्ही तुमची मागील पेमेंट वेळेवर आणि कार्यक्षमतेने केली आहेत का याची कल्पना येते.
CIBIL स्कोअर 300 ते 900 गुणांपर्यंत असतो. 700 पेक्षा अधिक गुण म्हणजे चांगला स्कोअर असतो. तुम्ही तुमचा CIBIL स्कोअर ऑनलाइन पध्दतीने सहज आणि मोफत तपासू शकता. तुमचा उच्च CIBIL स्कोअर तुम्हाला कर्ज सहज मंजूर होण्यास मदत करतो. TransUnion CIBIL वेबसाइटनुसार, ज्या ग्राहकांचे CIBIL स्कोअर 750 गुणांपेक्षा जास्त आहे त्यांना 79 टक्कांपर्यंत कर्ज दिले जाते.
तुम्ही तुमचा CIBIL स्कोअर अनेक एजन्सीद्वारे तपासू शकता. त्यापैकी काही एजन्सीज तुमचा CIBIL स्कोअर विनामूल्य सांगतात. तर काही एजन्सी त्यासाठी शुल्क आकारतात. websitecibil.com वर तुम्हाला दरवर्षी मोफत CIBIL स्कोअर रिपोर्ट दिला जातो. येथे तुमचा CIBIL स्कोअर मोफत तपासण्याची प्रक्रिया आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत.
• सर्वप्रथम cibil.com या वेबसाइटवर जा
• होमपेजवरील पर्सनल टॅबवर जा आणि help center वर क्लिक करा.
• आता फ्री CIBIL स्कोअर आणि रिपोर्ट निवडा.
• त्यानंतर Get Your Free CIBIL Score and Report बटणावर क्लिक करा.
• पुढील पानावर, तुम्हाला तुमची काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल. जसे की ईमेल आयडी, पासवर्ड तयार करा, नाव, मोबाईल नंबर आणि पॅन, पासपोर्ट, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशनकार्ड यांपैकी कोणताही आयडी क्रमांक.
• ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला Accept आणि Continue वर क्लिक करावे लागेल.
• यानंतर तुम्हाला सबस्क्रिप्शन प्लॅन निवडण्यास सांगितले जाते. पण इथे तुम्हाला सर्वात खाली दिलेल्या No Thanks या बटणावर क्लिक करावे लागेल.
• त्यानंतर, तुम्ही या साइटचा वापर कोणत्या उपकरणाद्वारे करत आहात, त्याला या वेबसाइटसह जोडण्यास (पेअर करण्यास) सांगितले जाईल. कारण जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही या साइटवर लॉग इन कराल तेव्हा तुमची लॉगिन प्रक्रिया अधिक सोपी होईल.
• इथे तुमच्या इच्छेनुसार कोणताही पर्याय निवडून तुम्हाला Continue वर क्लिक करावे लागेल.
• आता तुमच्या समोर एक स्क्रीन दिसेल ज्यावर "you have successfully enrolled" असे लिहिले असेल.
येथेच तुम्हाला Go To Dashboard चे बटण दिसेल त्यावर क्लिक करा.
• पुढील स्क्रीनवर तुम्हाला तुमचे शहर, उत्पन्नाचा प्रकार आणि मासिक उत्पन्न विचारले जाईल. जेणेकरुन तुम्हाला खास तुमच्यासाठी योग्य क्रेडिट्सच्या ऑफर देता येतील. येथे आपली इच्छा नसल्यास, आपण वरील क्रॉस चिन्हावर क्लिक करून हा पर्याय वगळून पुढे जाऊ शकता.
• पुढील पानावर तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर दिसेल. तुम्हाला वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा स्कोअर तपासायचा असल्यास त्यासाठीचे शुल्क द्यावे लागेल.
• या व्यतिरिक्त, CRIF, Experian सारख्या अनेक अधिकृत संस्था आहेत. ज्याद्वारे तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर निशुल्क तपासता येइल.
काही थर्ड पार्टी वेबसाइट्स आणि अॅप्स आहेत जे तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर सांगतात. परंतु त्यांच्या सुरक्षिततेवर आणि विश्वासार्हतेवर पूर्ण विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. त्यामुळे अधिकृत वेबसाइटस् आणि अॅप्स चा वापर करावा.
https://youtu.be/3fSaliwKoio