नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ग्रॅज्युएट एप्टीट्यूट टेस्ट इन इंजिनिअरींग अर्थात गेट- 2022 ही परिक्षा पुढे ढकलण्याच्या विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून लवकर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. सदर याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेतली जाईल, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना संकटामुळे ही परिक्षा पुढे ढकलली जावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
गेट 2022 परिक्षा 5, 6, 12 आणि 13 फेबु्रवारी रोजी होणार आहे. कोविड संकटामुळे अनेक राज्यांतील शाळा, महाविद्यालये बंद आहेत तर काही ठिकाणी संचारबंदी लागू आहे. अशा स्थितीत या परिक्षा पुढे ढकलल्या जाव्यात, अशा विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे. कोविडमुळे सरकारी भरतीच्या अनेक परिक्षा रद्द करण्यात आल्या असल्याचा संदर्भही याचिकेत देण्यात आला आहे.
हे ही वाचलं का