

पुणे: पुढारी वृत्तसेवा
व्हॉट्स अॅप भारतासह अनेक देशांमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. या माध्यमातून लोक माहितीची देवाणघेवाण करतात. याचबरोबर अनेक खासगी गोष्टीही शेअर केल्या जातात, त्यामुळे तुमचे व्हॉट्स अॅप खाते सुरक्षित असणे गरजेचे आहे. अलीकडे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये व्हॉट्स अॅप अकाउंट हॅक झाल्याचे सांगण्यात आले आहे. जर तुम्हाला तुमचे व्हॉट्स अॅप खाते सुरक्षित ठेवायचे असेल आणि हॅकिंग रोखायचे असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
व्हॉट्स अॅपमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शनची सुविधा आहे. ज्यामध्ये केवळ तुम्ही आणि ज्याला संदेश पाठवला आहे, या दोनच व्यक्ती तो संदेश वाचू शकतात. व्हॉट्सअॅप देखील तो संदेश पाहू शकत नाही. तुम्हाला एंड-टू-एंड एन्क्रिप्शन करायचे असल्यास, ज्या व्यक्तीला संदेश पाठवायचा अाहे, त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करून क्यूआर कोड आणि 60 अंकी क्रमांक पाहण्यासाठी एन्क्रिप्शनवर क्लिक करा.
तुमच्या खात्यावर पाठवली जाणारी कोणतीही अनोळखी लिंक उघडू नका. कोणतीही लिंक "https"ने सुरू होत असेल तरच लिंकवर क्लिक करा. लिंक सुरक्षित आहे का हे तपासण्यासाठी, तुम्ही गूगल वरील वेगवेगळे अहवाल पाहू शकता. तसेच कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करू नका.
या फीचरमुळे तुमचे व्हॉट्स अॅप अकाऊंट अधिक सुरक्षित होते. टू-स्टेप व्हेरिफिकेशन करण्यासाठी, सर्वप्रथम व्हॉट्स अॅप उघडा, मग सेटिंग्ज वर क्लिक करून अकाउंट्स वर जा. मग टू-स्टेप व्हेरिफिकेशन वर क्लिक करा आणि तूम्हाला हवा असणारा चार अंकी पासवर्ड टाका. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल अॅड्रेस टाकवा लागतो. आता तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचे व्हॉट्सअॅप खाते उघडू शकणार नाही.
व्हॉट्स अॅप वापरकर्त्यांना अनेक गोपनीयतेचे पर्याय उपलब्ध आहेत. तूम्ही तूमचेे प्रोफाइल फोटो, अबाउट आणि स्टेटस कोणकोण पाहू शकते, हे स्वतः ठरवू शकता. हि सेटिंग अनेबल केल्याने इतर कोणीही तूमचेे प्रोफाइल फोटो, अबाउट आणि स्टेटस पाहू शकणार नाही.
तुमचा फोन हरवल्यास काय कराल?
तुमचा फोन इतर व्यक्तीच्या हाती लागल्यास व्हॉट्स अॅपवरून तुमचा डेटा मिळवून त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे फोन हरवल्यास, तुम्ही व्हॉट्स अॅप अकाउंट बंद करायला हवे. व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन डिलीट माय अकाऊंट हा पर्याय निवडा, फोन नंबर टाका आणि नंतर "डिलीट माय अकाउंट" वर क्लिक करा.
व्हॉट्स अॅप वेबमधून लॉग आउट करा
तुम्ही सायबर कॅफमध्येे, ऑफिसमध्ये किंवा इतर व्यक्तीच्या डेस्कटॉपवर तुमचे व्हॉट्स अॅप अकाउंट उघडले असेल तर तूमचे काम झाल्यानंतर त्या डिव्हाइसमधून व्हॉट्स अॅप लॉग आउट करा. अन्यथा तुमच्या अकाउंटचा इतर व्यक्ती गैरवापर करू शकतात.
व्हॉट्स अॅप स्क्रीन लॉक करा
अॅंड्रॉइड डिव्हाइससाठी व्हॉट्स अॅप लॉक स्क्रीन हा पर्याय वापरा. यामुळे इतर कोणीही तुमचे व्हॉट्स अॅप अकाउंट अॅक्सेस करू शकत नाही. यासाठी सेटिंग्ज मेनूमध्ये जाऊन सिक्यूरिटी वर जा आणि नंतर स्क्रीन लॉक पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला तुमच्या फिंगरप्रिंटची नोंदणी करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक वेळी तुम्ही व्हॉट्स अॅप उघडाल तेव्हा तुम्हाला तुमचे फिंगरप्रिंट स्कॅन करावे लागेल. यामुळे इतर कोणीही तूमचे व्हॉट्स अॅप पाहू शकणार नाही.
https://youtu.be/3fSaliwKoio