budget update on farmers : शेतकऱ्यांना काय मिळाले ? ५ घोषणांमधून जाणून घ्या

budget update on farmers : शेतकऱ्यांना काय मिळाले ? ५ घोषणांमधून जाणून घ्या

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सन २०२२-२३ साठी केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जात आहे. तीन कृषी कायद्यांवरून देशात झालेला शेतकऱ्यांचा घनघोर संघर्ष त्यानंतर मोदी सरकारने कायदे रद्द करण्याची केलेली घोषणा यामुळे शेतकऱ्यांसाठी वेगळी घोषणा काय होते का ? याकडे सर्वांचे लक्ष होते.

दरम्यान, बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय असेल याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे.

  • भारतात रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल
  • पीक मुल्यांकन, भूमी अभिलेखांचे डिजिटायझेशन, कीटकनाशकांची फवारणी यासाठी किसान ड्रोनच्या वापराला चालना दिली जाईल.
  • गहू आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना 2.37 लाख कोटी रुपयांची MSP थेट पेमेंट केले जाईल
  • नैसर्गिक, शून्य-बजेट आणि सेंद्रिय शेती, आधुनिक काळातील शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहित केले जाईल
  • सह-गुंतवणूक मॉडेल अंतर्गत एकत्रित भांडवलासह निधी नाबार्डद्वारे कृषी उत्पादन मूल्य शृंखलेसाठी कृषी आणि ग्रामीण उद्योगांमधील स्टार्टअप्सना वित्तपुरवठा करण्याची सुविधा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news