

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हैदराबाद येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेतील चार आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी (Police) 2019 साली एन्काऊंटर केला होता. या प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला होता.
हैदराबाद येथील बहुचर्चित एन्काऊंटर प्रकरणी माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने सोमवारी आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने आयोगाचा कार्यकाळ सहा महिन्यांसाठी वाढविला होता. आयोगाला आणखी मुदत दिली जाणार नाही, असे त्यावेळी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी स्पष्ट केले होते.
आयोग जोपर्यंत आपला अहवाल सादर करीत नाही, तोपर्यंत अन्य कोणताही तपास वा मानवाधिकार संस्था या प्रकरणाचा तपास करु शकत नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाच्या स्थापनेवेळी 12 डिसेंबर 2019 रोजी दिले होते. तसेच आयोगाच्या तीन सदस्यांना सीआरपीएफची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती.
हे ही वाचलं का