हिंगोली : ‘स्‍वस्‍त धान्य’चा ४६० पोती गहू जप्‍त | पुढारी

हिंगोली : 'स्‍वस्‍त धान्य'चा ४६० पोती गहू जप्‍त

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी नेणारा ट्रक पकडला. यामध्ये ४६० पोते गहू असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री सोनपेठ (जि. प रभणी) येथील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाशीम येथून हा गहू हैदराबादकडे जात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. 

अधिक वाचा : मुंबई : चोरट्याशी झटापट, लोकलमधून पडून महिलेचा मृत्‍यू

 गव्हाचे पोते भरलेला ट्रक हैदराबादकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, ठोंबरे, भगवान आडे, आशिष उंबरकर, ठाकुर, पायघन, टापरे, शेख जावेद यांच्या पथकाने वाहनांची तपासणी मोहिम सुरु केली होती.

अधिक वाचा : ‘…त्यामुळे फडणवीस खडसेंच्या घरी गेले असतील’

 पोलिसांनी एका ट्रकची (क्र.एमएच-४६-एफ२२८६) तपासणी केली. पोलिसांनी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता त्याने ट्रकमध्ये गव्हाचे पोते असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ट्रक जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणला. त्यानंतर गव्हाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता सदर गहू स्वस्त धान्य दुकानाचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी ट्रकमध्ये असलेले ५ लाख रुपये किंमतीचा ४६० पोती गहू व १२ लाख रुपये किंमतीचा ट्रक, असा एकूण १७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात ट्रक चालक शेख अब्दुल्ला शेख हैदर, सय्यद अजिम सय्यद कलीम (दोघे रा. सोनपेठ, जि. परभणी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. 

अधिक वाचा : मुंबईत पेट्रोलचे दर न्यू यॉर्कपेक्षा दुप्पट!

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये या ट्रकमध्‍ये वाशीम येथून गहू भरण्यात आला होता तर हा गहू हैदराबादकडे नेला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता पोलिसांनी वाशीम येथून कोणाकडून गहू भरला होता याची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक किशोर पोटे पुढील तपास करीत आहेत.

Back to top button