चंद्रपूर : जनावरे चारायला गेलेला गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार | पुढारी

चंद्रपूर : जनावरे चारायला गेलेला गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा ; नागभीड तालुक्यातील तळोधी पासून ७ किलोमीटर अंतरावरील आकापूर येथील जनावरे चारायला गेलेला गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. ही घटन काल १९ जूनला सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान घडली. खटू कुंभरे (वय ६७) असे मृत गुराख्याचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार, आकापुर येथील खटू कुमरे हा गुराखी दररोज गावातील गुरे चारण्यासाठी नेत असे. नित्यनियमाप्रमाणे काल शनिवारी शुध्दा त्याने तळोधी वनपरिक्षेत्रातील संरक्षित वनक्षेत्रातील कक्ष क्र. ६९१ मध्ये गंगासागर हेही परिसरात जनावरे चरण्यासाठी नेले होते. शेतालगत दडी मारून बसलेल्या वाघाने अगोदर एका गाईवर हल्ला चढविला. तिला सोडवण्यासाठी गेले असता खटू कूंभरे यांच्यावर वाघाने हल्ला केला. तोजागीच जागीच ठार झाला. 

वाघ आणि गुराखी याच्यांत झडप सुरू असताना किंचाळण्याचा आवाज ऐकून लगतच्याशेतात काम करीत असणाऱ्या काही महिला आणि पुरुष यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता गुराखी खटू भानू कुंभरे मृतावस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभाग व तळोधी येथील ठाणेदार खैरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह  शवविच्छेदनसाठी नागभीड येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले.

मृताच्या कुटूबियांना २० हजाराची मदत

अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगत असलेल्या मृत गुराखी खटू कुंभरे याच्या कुटूबिंयांना वनविभागाच्यावतीने तातडीने विस हजार रूपयाची मदत करण्यात आली आहे. गावातील जनावरेराखून कुटूंबाचा करीत होता परंतु कर्त्याचा मृत्यू झाल्याने कुटूंब उघड्यावर आहे. वनविभागाने तातडीने भरीव मदत करावी आणि वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी शेतमजूर करीत आहेत.

Back to top button