Brazil Independence Day 2022 : कोण आहेत ब्राझीलचे पहिले सम्राट? ज्यांच्या हृदयाचे स्वातंत्र्याच्या द्विशताब्दी सोहळ्यात प्रदर्शन

Brazil Independence Day 2022
Brazil Independence Day 2022
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 200 वर्षांपूर्वी पोर्तुगालपासून ब्राझीलच्या स्वातंत्र्याची घोषणा करणारे आणि ब्राझीलचे पहिले "सम्राट" म्हणून ओळखले जाणारे डोम पेड्रो (पहिला सम्राट) यांचे हृदय सोमवारी पोर्तुगालहून ब्राझीलमध्ये आणण्यात आले. हे ह्रदय स्वातंत्र्याचा (Brazil Independence Day 2022) एक भाग म्हणून प्रदर्शनात ठेवले जाणार आहे. ब्राझीलचा हा २०० वा स्वातंत्र्यदिन आहे. त्यानिमित्ताने डोम पेड्रो यांचे जतन केलेले हृदय पोर्तुगालहून लष्करी विमानाने ब्राझिलियामध्ये आणण्यात आले.

1834 मध्ये पेड्रो यांचे वयाच्या 35 व्या वर्षी पोर्तुगालमध्ये निधन झाले. तेव्हापासून त्यांचे हृदय पोर्तुगीज शहरात फॉर्मल्डिहाइड असलेल्या कलशात जतन करुन ठेवण्यात आले होते. पोर्तुगीज सरकारने द्विशताब्दी सोहळ्यासाठी ब्राझीलला तीन आठवड्यांसाठी पेड्रो यांचे हृदय  देण्याचे मान्य केले आणि लष्करी विमानाने ते ब्रासिलियात आणण्यात आले. तिथे सोमवारी ब्राझीलच्या संरक्षणमंत्र्यांनी त्याचे स्वागत केले.

राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी मंगळवारी राष्ट्रपती राजवाड्यात लष्करी सन्मान आणि बंदुकीच्या सलामीसह ह्रदयाचे अवशेष स्वीकारले. 7 सप्टेंबर रोजी ब्राझीलच्या स्वातंत्र्यदिनी परराष्ट्र मंत्रालयात सार्वजनिक प्रदर्शनात ते ठेवले जाणार आहे. पेड्रो यांनी पोर्तुगालपासून स्वातंत्र्याची घोषणा केली, ज्याला ब्राझिलियन त्यांच्या देशाचा जन्म मानतात.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news