Rujuta diwekar navratri diet plan : नवरात्रात उपवासाचा डाएट प्लॅन काय? सांगते ऋतुजा दिवेकर | पुढारी

Rujuta diwekar navratri diet plan : नवरात्रात उपवासाचा डाएट प्लॅन काय? सांगते ऋतुजा दिवेकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना हेल्थ डाएट प्लॅन सांगणाऱ्या न्युट्रीशियन ऋतुजा दिवेकर यांनी खास नवरात्रीसाठी डाएट प्लॅन सांगितला आहे. ऋतुजा यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक चार्ट शेअर केला आहे. (rujuta diwekar navratri diet plan) या चार्टमध्ये ऋतुजा दिवेकर यांनी सांगितलं आहे की – नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी आपल्या आहारावर लक्ष कसे द्यावे. (rujuta diwekar navratri diet plan)

जेवण घेण्याची वेळ ते जेवणातील मेन्यू काय असतील, इथंपर्यंत ऋतुजाने डाएट चार्ट दिलाय. तुम्ही जर एखादा पदार्थ खात नसाल तर त्याला ऑप्शन म्हणून दुसरा मेन्यू देण्यात आला आहे.

सकाळी उठल्यानंतर ताजे फ‍ळ, सुकामेवा. ऑप्शनला तुम्ही चार्ट बघू शकता.

नाश्तामध्ये शाबुदाणा खिचडी, बटाटा, दही, बटाट्याची खीर, चना पुरी , हलवा.

दुपारच्या जेवणात – राजगीरा, रताळे, मखना रोटी, भाजी, उपवासाचे थालीपीठ.

रात्रीच्या जेवणात- ताजे एक फळ, मिल्कशेक, ताक, खीर, बीट चाट, शाबुदाणा वडा दहीसोबत खावे.

या डाएटसोबत ऋतुजा यांनी या डाएटमुळे काय काय फायदे होतील, यासंबंधीत माहिती दिलीय. मूड स्विंग्स, हार्मोन बॅलन्स करण्यासाठी मदत, पचनक्रिया व्यवस्थित राहेत, त्वचा चमकदार होईल आणि केस दाट होण्यासाठी मदत होईल.

ऋजुता दिवेकर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची न्युट्रिशिएस्ट आहे. त्यांनी करिश्मा कपूर, करीना कपूर यांना मार्गदर्शन केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rujuta Diwekar (@rujuta.diwekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rujuta Diwekar (@rujuta.diwekar)

Back to top button