’पीएफआय’च्या सोलापुरातील कार्यकर्त्यास अटक; एनआयए, एटीएस, गुन्हे शाखेची संयुक्‍त कारवाई | पुढारी

’पीएफआय’च्या सोलापुरातील कार्यकर्त्यास अटक; एनआयए, एटीएस, गुन्हे शाखेची संयुक्‍त कारवाई

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा; सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. राज्यात ’पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या माध्यमातून काहीतरी अनुचित प्रकार घडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील ’पीएफआय’च्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे. सोलापूर शहरातील सहारा नगर परिसरातील पीएफआयच्या एका कार्यकर्त्याला एनआयए, एटीएस व शहर गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्‍त कारवाई करीत अटक केली आहे.

आसिफ शौकत शेख (वय 40, रा. प्लॉट नं. 24, सहारा नगर भाग 2, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापूर्वी देखील शेख याच्याविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे प्रतिनिधी व कार्यकर्ते एनआयए, एटीएस व पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहेत. सोलापूर शहरात पीएफआयकडून नुपूर शर्मा प्रकरण, हिजाब प्रकरण, शाहीनबाग प्रकरण, रोंहिग्या मुस्लीम प्रकरण चालू असताना आंदोलने करण्यात आली होती. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झालेला होता. तसेच पुणे येथे पीएफआय कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने पुणे येथे घोषणाबाजी केल्याने जातीय तणाव निर्माण झाला होता. सोलापूर शहरातही पीएफआयचे सक्रिय कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाल्याने तपास यंत्रणाकडूनही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

’पीएफआय’: एनआयए, एटीएस, गुन्हे शाखेची संयुक्‍त कारवाई

सध्या देशात सर्वत्र नवरात्रौत्सवाची धूम सुरु आहे. पुणे येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरातदेखील तशाच स्वरूपाचे आंदोलन नवरात्रोत्सवामध्ये करण्याची दाट शक्यता असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊन जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात या संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर त्याची नोंद आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा व सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी पहाटे कारवाई करीत त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन विजापूर नाका पोलिस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी करून त्यास अटक करण्यात आली आहे. राष्ट्र्रीय तपास यंत्रणा तसेच सोलापूर पोलिसांकडून याचा पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button