आमदार जीत आरोलकर यांनी बळकावली जमीन | पुढारी

आमदार जीत आरोलकर यांनी बळकावली जमीन

पणजी ः पुढारी वृत्तसेवा :  धारगळ पेडणे येथील 1 लाख 48 हजार 800 चौ.मी. जागा मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी बळकावली. या जागेचे प्लॉट करून विकले. त्याबाबत योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी म्हापसा येथील व सध्या अमेेरिकेत वास्तवास करणारे 76 वर्षीय रवळू खलप यांनी सोमवारी पोलिस महासंचालकांकडे केली आहे.

याबाबत माहिती देताना खलप यांचे वकील आयरीश रॉड्रिगीज यांनी रवळू खलप यांच्या सोबत पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांची भेट घेतली. त्यानंतर अ‍ॅड. म्हणाले की, रवळू खलप यांची धारगळमध्ये मालमत्ता (जमीन) होती. ते अमेरिकेत राहात असल्याने जीत आरोलकर यांनी त्यांची मालमत्ता बळकावली व त्याचे 200 प्लॉट करून विकले. आपण त्यासंदर्भात 4 जुलै रोेजी रवळू खलप यांच्या वतीने एसआयटीकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सोमवारी पोलिस महासंचालकांना निवेदन देण्यात आल्याचे रॉड्रिगीज यांनी सांगितले.

Back to top button