पुढारी ऑनलाईन डेस्क: खुळा रस्सा म्हटले की आपल्या तोंडाला पाणी सुटते. हा खुळा रस्सा मटणाचा हे गणितही आपल्या मनात पक्के होते आणि आपल्या मनात मांडे फुटू लागतात. श्रावणाआधी येणाऱ्या गटारीला खुळा रस्सा करायचा अनेकांचा बेतही असेल.
मात्र, हॉटेलमध्ये मिळतो तो खुळा रस्सा किंवा व्हिडिओ पाहून केला जाणारा खुळा रस्सा खाल्ला की अनेकांचा भ्रमनिरास होतो.
स्सल खुळ्या रश्शाची चव या दोन्ही प्रकारांतील रश्शाला नसते. त्यामुळे खास गावरान पद्धतीचा खुळा रस्सा कसा असतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मटण आणि त्याच्यापासून बनवलेले पदार्थ कुणाला आवडत नाहीत? सध्या अनेक ठिकाणी आपल्याला मटणाचे विविध पदार्थ मिळणारे हॉटेल्स पहायला मिळतात.
मटण काला, मटण फ्राय, मटण कोल्हापुरी, मटण मालवणी, वजडी फुफ्फूस, पाया स्पेशल, रक्ती मुंडी स्पेशल असे अनेक प्रकार आपल्याला हॉटेलमध्ये खायला मिळतात. पण घरगुती स्वरुपात आणि मूळ स्वरुपात हे पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते.
अनेकदा आपल्या बोलण्यात पार्टी म्हटले की 'काय खुळा रस्सा आहे का?' असे सहज विचारले जाते. चला तर मग हा खुळा रस्सा कसा करायचा आणि त्याला 'खुळा' का म्हणता ते जाणून घेऊ.
खुळा रस्सा हा पदार्थ म्हणजे मटणापासून तयार केलेला झणझणीत पदार्थ. भाकरी आणि भातासोबत खाताना सोबत रुमाल किंवा टॉवेल घेऊनच बसावे लागेल असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे.
'खुळा' हा शब्दप्रयोग 'तिखट' या शब्दाशी साधर्म्य ठेवतो की काय असेही वाटेल. पण तसे काहीच नाही. या रश्शाची चव वेगळी असल्याने आणि बकऱ्याचे किंवा कोंबडीचे सर्व अवयव एकत्र शिजवल्याने त्याला एक वेगळीच चव येते.
त्यामुळे त्या चवीने येणारे फिल्लींग खुळा रस्सा काय हे समजून सांगते.
खुळा रस्सा हा प्रकार ग्रामीण भागात यात्रा, जत्रा किंवा पावणेर अशा वेळी चाखायला मिळतो.
पावणेर म्हणजे शेतीच्या कामावेळी लोक एकत्र येऊन कामे करत असत आणि त्यांना दिलेली पार्टी (आत्ताच्या भाषेत) म्हणजे पावणेर.
तर अशा वेळी बकरे कापले जायचे. यात्रा, जत्रेत देवाला बकरे देण्याचा प्रघात आहे. त्यावेळी रक्ती आणि मुंडी एकत्र केली जाते.
यात मऊ मटणही घातले जाते. तर अखंड बकऱ्याचे मटण एका पितळी हंड्यात किंवा मोठ्या भांड्यात शिजवून त्याचा रस्सा केला जातो.
सुक्के मटण केले जात नाही. त्यामुळे त्याची चव वेगळीच लागते. हा झाला मोठ्या प्रमाणातील खुळा रस्सा.
आता घरात काही आपण रोज बकरे शिजवू शकत नाही. त्यामुळे घरातल्या घरात हा रस्सा करायचा तर मटणही तसेच आणावे लागेल.
बाजारातून मटण आणताना बकऱ्याची मान, बरगडी, मांडीचे मटण आणावे. सोबत पायाचा काही भागही आणावा.
मुळात जेवणाला किंवा रश्शाला चव येते ती मसाल्यामुळे. आत्ता आपण मिक्सरवर मसाला वाटून घेतो.
त्याचा फायदा असा की सगळे मसाले बारीक होतात. मात्र, पाट्यावर वरवंट्याने वाटलेला खडा मसाला या रश्शाची चव वाढवतो.
मसाला तयार करण्याआधी दोन मोठे कांदे चुलीत किंवा जाळावर भाजून घ्यायचे. त्याचा पापुद्रा काढून तो सुटा करून घ्या.
त्याच्यासोबत पांढरे तीळ, स्टारफूल, दालचिणी, थोडे जिरे, हिंग, तीन-चार लवंगा, धने,लसूण, आले, तमालपत्री असे मसाले मटण ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात घ्या.
यातील भाजलेला कांदा, पांढरे तीळ आणि अन्य खडा मसाला एकत्र वाटून घ्या. हा मसाला वाटताना थोडे थोडे पाणी करून घ्या.
हेही वाचा:
पहा व्हिडिओ: प्रियांका चोप्रा आणि कोल्हापुरी स्ट्राँग वूमन