Radhika Apte Birthday : ‘जेव्हा पार्च्डसाठी मी कपडे उतरवले, तेव्हा लपवण्यासारखं काहीचं नव्हतं’

radhika apte
radhika apte
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte Birthday) चा जन्म ७ सप्टेंबर, १९८५ मध्ये तामिळनाडूत झाला होता. राधिकाने हिंदीसोबतच तमिळ, मराठी, तेलुगू, बंगाली आणि हॉलिवूडपटातही काम केले आहे. राधिकाने करिअर सुरूवात आधी थिएटरमध्ये केली होती. या जन्मदिनाच्या औचित्याने राधिका विषयी या खास गोष्टी जाणून घ्या. (Radhika Apte Birthday)

राधिकाचं चित्रपट करिअर

राधिका आपटेने २००५ मध्ये 'वाह लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. शाहिद कपूर आणि संजय दत्त स्टारर चित्रपटात राधिकाची भूमिका छोटी होती. मुख्य अभिनेत्री म्हणून राधिकाचा पहिला चित्रपट आनंद हा २००९ मध्ये प्रदर्शित झालेला बंगाली सामाजिक चित्रपट होता. २०१५ मध्ये बदलापूर आणि मांझी – द माउंटनमॅन या चित्रपटांमधील अभिनयासाठी राधिका आपटेचे खूप कौतुक झालं. तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही पदार्पण केलं. २०१६ मध्ये, राधिका 'फोबिया' आणि 'पार्च्ड'मध्ये मुख्य भूमिकेत दिसली आणि तिने बरीच प्रशंसा मिळवली. यानंतर राधिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही. लस्ट स्टोरीज, सेक्रेड गेम्स, गुल इत्यादी वेबसीरीजमध्येही ती झळकली. राधिकाने तमिळ चित्रपट कबाली, शोर इन द सिटी, अक्षय कुमारसोबत पॅडमॅन चित्रपट, बाजार, अंधाधुन यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्येही काम केले आहे.

राधिका आपटेची न्यूड क्लिप व्हायरल

काही वर्षांपूर्वी राधिक आपटे तिची न्यूड क्लिप व्हायरल झाल्यामुळे खूप वादात सापडली होती. त्यावेळी राधिका आपटेला खूप ट्रोल करण्यात आले होते. एका मुलाखतीत राधिकाने तिच्यावर खूप वाईट परिणाम झाल्याचे सांगितले होते. ग्राझिया मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत राधिका म्हणाली होती की, "क्लीन शेव्ह'च्या शूटिंगदरम्यान जेव्हा एक न्यूड क्लिप लीक झाली तेव्हा मला वाईटरित्या ट्रोल करण्यात आले आणि त्याचा माझ्यावर परिणाम झाला. मी चार दिवस घरातून बाहेर पडू शकले नाही. मीडियामध्ये बोलले जात होते की, माझा ड्रायव्हर, वॉचमन आणि माझ्या स्टायलिस्टच्या ड्रायव्हरने मला फोटोंमध्ये ओळखले होते. त्यामुळेच जेव्हा मी 'पार्च्ड'साठी कपडे उतरवले तेव्हा मला असं वाटलं की, लपवण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही."

राधिकाचे वैयक्तिक आयुष्य

राधिका २०११ मध्ये लंडनमध्ये बेनेडिक्ट टेलरला भेटली, जिथे ती नृत्य शिकण्यासाठी गेली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले होते. एकीकडे राधिकाने नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यावर कमी बोलणे पसंत केले आहे, तर दुसरीकडे ती अनेकदा सामाजिक विषयांवर उघडपणे बोलली आहे. राधिकाने MeToo मोमेंटवर आपले मत अगदी स्पष्टपणे व्यक्त केले होते.

राधिका चित्रपटसृष्टीपासून दूर राहते

बॉलीवूड सेलिब्रिटी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात, तर राधिका सिनेसृष्टीपासून दूर राहते. राधिका न बॉलीवूड पार्ट्यांचा भाग बनते किंवा न इतर सेलेब्सप्रमाणे पापाराझींनी स्पॉट करते. राधिका बहुतेकदा तेव्हाच प्रसिद्धीच्या झोतात येते जेव्हा तिचा एक चित्रपट प्रदर्शित होत असतो. राधिका आपटे लवकरच 'विक्रम वेधा' आणि 'मोनिका ओ माय डार्लिंग'मध्ये दिसणार आहे. दोन्ही चित्रपटांमधून तिचा लूक समोर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news